लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई: दरवर्षी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे मान्सूनपूर्व कामात शहरातील मोठे नाले आणि गटारे यांची सफाई करण्यास सुरुवात होते. मागील आठवड्यापासून नालेसफाईला सुरुवात झाली आहे. मात्र ही नालेसफाई करणाऱ्या कामगारांकडे मात्र कोणतेही सुरक्षात्मक साधने नसून हातानेच नाल्यातील गाळ काढला जात आहे. कामगारांना आवश्यक असलेले हातमोजे, बूट, मूखपट्टीविनाच छोट्या नाल्यांची सफाई करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सुरक्षात्मक साधनांविनाच सफाई करीत असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

सध्या नवी मुंबई शहरात मान्सूनपूर्व कामांतर्गत नालेसफाईला सुरुवात झाली आहे. नवी मुंबई शहरात ७७ नैसर्गिक मोठे नाले तर ५ लाख ९ हजार २६७ मीटर लांबीचे छोटे नाले असून या नाल्यातील गाळ काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ठेकेदाराला कामे दिली जातात. सध्या शहरात छोट्या नाल्यांची सफाई करण्यात येत असून नाल्यातील गाळ बाजूला काढला जात आहे. मात्र ही नालेसफाई करणारे कामगार विनासुरक्षा साधनांविनाच नाल्यात उतरून गाळ काढत आहेत.

आणखी वाचा- नवी मुंबई: काही मिनिटांच्या अंतरावर दोन सोनसाखळ्या चोरी

संबंधित ठेकेदाराकडून नालेसफाई करताना कर्मचाऱ्यांना सुरक्षात्मक साधने देणे गरजेचे आहे. मात्र सद्यःस्थितीत या कामगारांना गाळ उपसण्यासाठी हातमोजे, बूट, शिवाय मुखपट्टीही दिली गेली नाही. त्यामुळे या गाळाने या कामगारांचे शरीर पूर्णपणे माखत असून हा गाळ या कामगारांच्या नाकातोंडातही जात आहे. कोट्यवधी रुपयांचा फायदा खिशात घालणाऱ्या या कंत्राटदारांकडून कामगारांना सुरक्षेची कोणतीही साधने पुरविली जात नसून सुरक्षात्मक साधनांविनाच हे सफाई कामगार स्वच्छता काशरताना दिसत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका मात्र कानाडोळा करीत आहे.