उरण : जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी झालेल्या दोन डंपरच्या जोरदार धडकेत एका डंपर चालकाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ वरील पागोटे (डीआरटी) परिसरातील मार्गावर मागून येणाऱ्या मातीने भरलेल्या एका डंपरने दुसऱ्या डंपरला जोराने धडक दिल्याने डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती उरण वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : मोरबे धरणात सप्टेंबरपर्यंतचा जलसाठा; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
या मार्गावरून हजारो जड कंटेनर वाहने, तसेच मातीने भरलेल्या डंपरची वाहतूक होत आहे. या मार्गावरून वेगवान वाहतूक होत असल्याने अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. अपघात नक्की कशामुळे झाला? हे समजू शकले नाही. मात्र, धडक जोराची असल्याने वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.