उरण : येथील ऐतिहासिक द्रोणागिरी डोंगराला १६ फेब्रुवारीनंतर शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा वणवा लागला. सध्या ही आग करंजा परिसरातील द्रोणागिरी मंदीर परिसरात आहे. द्रोणागिरी डोंगराला खरंच आग लागली आहे, की आग लावली, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. मात्र, हा वणवा वाढू लागला आहे.

हेही वाचा – “शिवसेनेचे तुकडे झाले तसे भाजपाचेसुद्धा होऊ द्या, त्यात आमचाच फायदा”; खासदार इम्तियाज जलील यांची टीका

हेही वाचा – नवी मुंबई : पामबीच मार्गालगत असलेल्या कांदळवनाला आग; कत्तल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

उरणमधील द्रोणागिरी हा महत्त्वाचा डोंगर आहे. या डोंगराच्या पायथ्याशीच ओएनजीसीचा देशातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. त्यामुळे अतिसंवेदनशील डोंगरावर आग लागणे धोक्याचे आहे. त्याचप्रमाणे याच डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाली आहे.

Story img Loader