नवी मुंबई : कोपरखैरणे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हनुमंत केकान या हवालदाराने मद्याच्या धुंदीत गोंधळ घालत काही जणांना मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. हनुमंत याने एका हॉटेल चालकाला, कामगारालाही मारहाण केली. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार भोसले यांनी तात्काळ पथक पाठवून केकान यांना पकडून थेट पोलीस ठाण्यात आणले.

हेही वाचा – नवी मुंबई : कोपरी गाव स्मशानभूमीची दुरवस्था

हेही वाचा – रायगड : द्रोणागिरी डोंगराला पुन्हा वणवा; वणवा की लावलेली आग?

केकान यांना अक्षरशः पोलीस गाडीत कोंबण्यात आले. त्यात गाडीची मागील काचही निखळून पडली. मद्याचा प्रभाव प्रचंड झाल्याने आपण आपल्याच सहकाऱ्यांशी वाईट वागत आहोत याचे भान केकान यांना नव्हते. याबाबत केकान यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांची शुक्रवारीच वैद्यकीय तपासणी केली असून अहवाल येताच योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. पोलिसांची बदनामी होईल, असे कुठलेली कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असेही पानसरे यांनी सांगितले.

Story img Loader