वाशी सेक्टर २९मध्ये रस्त्यात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मद्यपींनी वाशी पोलीस ठाण्यातील पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. वाशी पोलिसांनी या घटनेतील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश पाटील, अभिमन्यू थापा, पाथ्रेश संपत, राजन मूर्ती, असीम परमार आणि कुशल दोशी अशी अटकेतील तरुणांची नावे आहेत.
वाशी सेक्टर २९मधील राजीव गांधी मैदानासमोरील पदपथावर बसून दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याची माहिती काही दक्ष नागरिकांनी भ्रमणध्वनीवरून पोलिसांना दिली. त्यामुळे वाशी पोलीस ठाण्यातील बिट मार्शल घटनास्थळी जाऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र मद्यपींनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
या घटनेची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे व त्यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना वाहनात बसण्यास सांगितले. मात्र मद्यपींनी पोलिसांना धक्काबुक्की करीत पळ काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी एका पोलिसाच्या हाताला दुखापत झाली.
धिंगाणा घालणाऱ्या मद्यपींची पोलिसांना धक्काबुक्की
या घटनेची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे व त्यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 06-05-2016 at 03:09 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk group creates ruckus in vashi police station