दोन मित्रांनी मद्य प्राशन  केले. आणि घरी जात असताना त्यांच्या लक्षात आले कि मद्याचा अंमल जास्त झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्क करून तेथेच झोपले.  मात्र जाग आल्यावर आपली दुचाकी कोणी तरी चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या बाबत त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून सीबीडी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक परमेश्वर आणि त्याचा मित्र रोहिदास यांनी काम संपल्यावर भरपूर मद्य प्राशन  केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> खारघरमधील लिटील वर्ल्ड मॉलमधील सिनेमागृह कामगारांचा वाद पोलीस ठाण्यात

मद्य प्राशन  केल्यावर दोघेही पहाटे अडीचच्या सुमारास  परमेश्वर यांच्या दुचाकी वरून तुर्भेच्या दिशेने निघाले. दरम्यान  लघुशंका करण्यासाठी सीबीडी येथील उड्डाणपूल संपताच गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली. रस्त्याच्या कडेलाच लघुशंका केल्यावर आपल्याला मद्याचा अंमल  जास्त झाला असून गाडी चालवू शकत नाही, त्यामुळे इथेच झोपू असा विचार करत त्यांनी पदपथावरच  झोपले. सकाळी पाच वाजता त्यांना जाग आल्यावर दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. कदाचित दुसरीकडे पार्क केली असावी अशा शक्यतेने त्यांनी आसपास दुचाकीचा शोधही घेतला मात्र दुचाकी आढळून आली नाही . त्यामुळे त्यांची खात्री झाली कि झोप लागल्यावर कुणीतरी गाडी चोरी केली . या बाबत त्यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी ५० हजार रुपयांची दुचाकी चोरी झाल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk man bike stolen in navi mumbai zws
Show comments