उरण: वायू प्रदूषणात वाढ होऊन उरणच्या हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने २५० पेक्षा अधिकचा राहत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी हे वातावरण अपायकारक असल्याचे स्पष्ट होत आहे. हवेच्या ढासळत्या गुणवत्तेने उरणच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दिवसभराच्या धुरके सदृश वातावरणामुळे उरण तालुक्यात सर्दी- खोकला या श्वसनाच्या आजाराच्या प्राथमिक तक्रारी वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून कानाडोळा केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण मधील धुळीकणाच्या प्रदूषणात दररोज वाढ होत आहे. हा हवेचा गुणवत्ता निर्देशांक १९६ वरून वाढत ३४८ ते मंगळवारी रात्री १० वाजता २६६ वर पोहचला होता. सप्टेंबर महिन्यात १९६ वर हवा निर्देशांक असताना उरण देशातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून नोंद झाली होती. त्यानंतर प्रदूषणाच्या मात्रेत वाढ सुरूच आहे. या मात्रेमुळे उरणची पुन्हा एकदा देशातील पहिल्या क्रमांकाच्या प्रदूषित यादीत नोंद असून काही दिवसातच उरण हे देशातील सर्वात प्रदूषित शहराच्या रांगेत पहिल्या स्थानावर येत आहे.

हेही वाचा… क्रिप्टो करेंसी- कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे अटक; तात्काळ कारवाईमुळे ३२ कोटीची रक्कम गोठवली

उरण मधील जेष्ठ नागरिकांच्या पुढाकाराने येथील शासकीय यंत्रणेला गुरुवारी सह्यांचे निवेदन तहसीलदाराना देण्यात आले आहे. त्याची दखल घेत योग्य ती उपाययोजना न केल्यास त्यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

क्षय आणि निमोनियचा धोका:

हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे प्रथम सर्दी आणि खोकला वाढू लागतो. त्यामुळे क्षय व निमोनियचा सारखे गंभीर आजार ही होण्याची शक्यता असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या उन्हामुळे आशा प्रकारच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to continuous air pollution of uran primary complaints of respiratory diseases such as cold and cough are increasing dvr
Show comments