उरण येथील खोपटा खाडीपूल हा वाहनांच्या वाहतुकीसाठी असतांना या पुलावर अवजड वाहने पार्क करण्यात आली आहेत. यामुळे पुलावरून खोपटा परिसरता जाणाऱ्या पुलाची एक मार्गिका व्यापल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार आशा प्रकारची वाहने पार्किंग केली जात असल्याने पूल वाहतुकीसाठी आहे की पार्किंगसाठी असा सवाल येथील नागरिकांकडून करीत संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : वाशी मनपा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; तीन वर्षांनी सात जणांवर गुन्हा दाखल 

Elphinstone Road Over Bridge
Elphinstone Bridge: मुंबईतील १२५ वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल पाडला जाणार; वाहतूक कोंडीमुळे हाल होणार?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
dilapidated, bridge, Mumbai, traffic ,
मुंबईतील आणखी एक पूल जीर्ण, पुनर्बांधणीसाठी वाहतूक बंद
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
GBS , Pune, GBS affected area,
पुणे : राजाराम पूल ते खडकवासला दरम्यान जीबीएसचे बाधित क्षेत्र घोषित!
reconstruction of Bridge located between Mahim and Bandra stations successfully completed
माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण
coastal road issue environmentalists oppose giving part of land close to sea to breach candy
कोस्टल रोड मार्गात नवा पेच; भराव भूमीचा भाग ब्रीच कँडीला देण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध
Traffic jam on the old Pune to Mumbai highway Pune news
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरणमधील पूर्व व पश्चिम या दोन्ही विभागांना जोडणाऱ्या खोपटा खाडी पुलावरून २३ वर्षापासून वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे मुंबई. गोवा, अलिबाग यांना जोडणारा हा महत्वाचा पूल ठरला आहे. आणि पनवेल मार्गे अधिक अंतराचा व इंधन बचतीचा प्रवास होऊ लागला आहे. तसेच या पुलामुळेच उरणच्या पूर्व विभागात जेएनपीटी बंदरावर आधारित उद्योग उभे राहू लागले आहेत. त्याचा लाभ या परिसरातील नागरिकांना झाला आहे. यातून रोजगार व व्ययसायात ही वाढ झाली आहे.या वाढत्या उद्योगामुळे जुना खोपटा पूल कमी पडू लागला होता. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याच पूलाशेजारी आणखी एक पूल उभारला आहे. यातील एक पूल येणाऱ्या व दुसरा जाणाऱ्या वाहनांसाठी वापरला जात आहे.

हेही वाचा- उरण: खोपटे खाडीकिनारी मृत मासे, मृत्यूचे कारण अस्पष्ट

खोपटा विभागात जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या नव्या पुलावर ही अवजड वाहने पार्क केली जात आहेत. या संदर्भात उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता पुलावर अवजड वाहनांची पार्किंग होऊ नये याकरीता वाहतूक विभागाशी संपर्क करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Story img Loader