उरण: ऑक्टोबर मधील कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत आहे. ती शमविण्यासाठी उरणच्या बाजारात रसरशीत ताडगोळे विक्रीसाठी येऊ लागले आहेत. मात्र ताडगोळ्यांच्या आगमनाची सुरुवात असल्याने त्याची किंमत दहा रुपयांना एक नग म्हणजे १२० डझनावर पोहचली आहे. ताडगोळे महाग असले तरी त्याला मागणी असून आवक वाढल्यानंतर किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
परतीचा पाऊस लांबला असला आणि वतावरणात गारवा होऊन धुके पडू लागले आहे. तर काही प्रमाणात थंडीत ही वाढ झाली आहे. त्यामुळे परतीचा पाऊस संपला का हा प्रश्न आहेच,मात्र मागील आठवडा भरापासून उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. दिवसभर उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली वाढू लागली आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे फळांचे मोसमाही ठरले आहेत.
हेही वाचा… ऐरोली-काटई मार्गावर नवी मुंबईतून जोड मार्गिका; ५० कोटींचे कंत्राट बहाल, लवकरच कामाला सुरुवात
नैसर्गिक पाण्याने भरलं हे फळ चवीलाही गोड असून त्यामुळे शरीराला गारवा मिळतो.त्यानुसार ताडाच्या झाडावर येणारे ताडगोळे ही तयार झाल्याने त्याची विक्री बाजारात सुरू झाली आहे. ताडगोळ्याचा मोसम उशिरा सुरू झाल्याने व ताडाच्या उंच झाडावर चढणाऱ्याची संख्या ही कमी असल्याने ती उतरविण्याचा खर्च वाढला आहे. यामध्ये एका झाडाला दोन ते अडीच हजार रुपये उत्पन्न मिळते. तर काहीजण वार्षिक ५०० रुपये भाड्याने एक ताडाचे झाड विकत घेऊन व्यवसाय करणारे अनेकजण असल्याची माहिती चाणजे येथील शेतकरी निरंजन राऊत यांनी दिली. तर यावर्षी आगमनालाच ताडगोळ्याचा किमती वाढल्या असल्याची माहिती उरण मधील ताडगोळे विक्रेत्या रखमाबाई पाटील यांनी दिली आहे.