पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यातील पाणी सुकू लागल्याने रस्त्यावर त्याची धूळ निर्माण होत असल्याने उरणच्या रस्त्यांवर धुळींचे लोट पसरू लागेल आहेत. त्यामुळे वाहन चालक व प्रवाश्यांना धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा- देशी लसणाकडे ग्राहकांची पाठ; मोठ्या पाकळ्या असणाऱ्या उटी लसणाला अधिक पसंती
प्रवाशांना धुळीचा त्रास
उरणमधील राष्ट्रीय,राज्य व गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेली खडी, आणि सिमेंट तर काही खड्डे चक्क मातीने भरण्यात आले होते. त्यामुळे खड्डयात पाणी सुकल्याने त्याची धूळ निर्माण होऊ लागली आहे. या खड्ड्यातून वेगाने वाहने जात असतांना धूळ निर्माण होत आहे. दुचाकीवरून तसेच एस. टी. व एन एम एम टी या सार्वजनिक वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा- नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कर वसुली वाढली; या वर्षाअखेरीस ८०० कोटी वसुलीचे लक्ष्य
वाहनचालकांना जडू शकतो श्वसनाचा आजार
यामध्ये उरण पनवेल मार्ग, जासई ते गव्हाण, खोपटा कोप्रोली मार्ग,दास्तान ते दिघोडे आदी मार्गावर धुळींचे लोट निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रवासी व वाहन चालकांना श्वसनाच्या आजार जडण्याची शक्यता आहे.