ऑगस्टपर्यंत २०५ जणांकडून दंडवसुली नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘ई चलान’द्वारे या वर्षी तब्बल ३ हजार ५७५ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५ लाख ८० हजारांची दंडवसुली करण्यात आली आहे. मात्र यासाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरत आहे, ती गाडी मालकाचा अपूर्ण पत्ता. यामुळे गतवर्षी १ हजार ८७ तर या वर्षी ऑगस्टपयर्र्त २०५ जणांकडून दंडवसुली करताच आली नाही.

नवी मुंबईतील वाहतूक सुरळीत होण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला चाप बसवण्यासाठी वाहतूक विभाग सीसीटीव्हीची मदत घेते. यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ५७३ सीसीटीव्ही कॅमेराची मदत घेण्यात येत असून या पैकी २५७ सीसीटीव्ही केवळ परिमंडळ एकमध्ये आहेत. यात सर्वाधिक ‘ई चलान’ची कारवाई पामबीचवर केली गेली आहे.

नवी मुंबईत सिग्नल असलेल्या बहुतांश चौकांत सीसीटीव्ही आहेत, तर पामबीचवरील सर्व सिग्नल्सवर सीसीटीव्ही आहेत. याची माहिती बहुतांश नवी मुंबईकरांना आहे, तरीही सर्रास नियम मोडले जात आहेत.

२०१७ मध्ये एकूण ३ हजार ७४ जणांना ‘ई चलान’द्वारे दंड ठोठावला असून त्याद्वारे १ लाख ९९ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. तर या वर्षी ३१ ऑटोबपर्यंत ३ हजार ५७५ जणांवर कारवाई करण्यात येऊन ५ लाख ८० हजारांची दंडवसुली करण्यात आली आहे. या वसुलीतील तफावत मोठी असून वाहतूक नियमात दंड रकमेमध्ये केलेल्या वाढीमुळे या दंड रकमेत भरीव वाढ झाली आहे.

सीसीटीव्हीत सापडूनही पत्ता सापडेना

एखाद्या वाहनचालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर गाडीला लावण्यात आलेल्या क्रमांक सीसीटीव्हीद्वारा ओळखून दंड आकाराला जातो. या क्रमांकावरून गाडीमालकाचा पत्ता शोधून पोस्टाद्वारे चलान पाठवले जाते. मात्र गाडी अन्य व्यक्तीला विकलेली असणे, ज्याला विकली त्याचा पत्ता ठाऊ क नसणे, गाडीच्या कागदपत्रावरील पत्ता बदललेला असणे वा अपूर्ण असणे, असे प्रकार समोर येतात. त्यामुळे वाहनचालकाने नियमांचे उलंघन केले तरी तो सुटतो.