नवी मुंबई : नवी मुंबईत राबवण्यात आलेला इ टॉयलेट उपक्रम अयशस्वी ठरला असून या ठिकाणी आता पारंपरिक शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शहरात विविध १५ ठिकाणी प्रत्येकी सुमारे ९ लाख खर्चून इ-टॉयलेट बांधण्यात आले होते. त्यात तीन खास महिलांसाठी (She Toilet) होते. आधुनिक शहर म्हणून शहरात १५ ठिकाणी इ टॉयलेट बांधण्यात आले होते. हे बांधताना जागा निश्चितीला प्राधान्य देण्यात आले. खास करून प्रति महामार्ग असलेल्या पाम बीच, ठाणे बेलापूर, शीव पनवेल मार्गावर तसेच एमआयडीसीत बांधण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सर्व टॉयलेटमध्ये अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. नाणे टाकूनही दरवाजा न उघडणे, व्यक्ती आत गेल्यावर दरवाजा न उघडल्याने ती व्यक्ती आताच अडकून बसने, पाण्याची टाकी भरलेली असूनही पाणी पुरवठा न होणे अशा अनेक अडचणी येत होत्या. याशिवाय, नाणी असलेला डब्बा चोरीला जाण्याच्या घटनादेखील घडत आहेत. परिणामी हळूहळू त्याचा वापर पूर्ण बंद पडला. सध्या यातील जवळपास सर्वच इ टॉयलेट धूळ खात पडून आहेत.

शुक्रवारी मनपाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या वेळी इ टॉयलेट बाबत विचारणा केली असता मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी माहिती देताना सांगितले की इ टॉयलेट उपक्रमाला अपेक्षित यश न आल्याने उपक्रम बंद करण्यात येत आहे. मात्र नागरिकांची अडचण लक्षात घेता या सर्व ठिकाणी पारंपरिक सार्वजनिक शौचालय बांधण्यात येणार आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E toilet concept in navi mumbai fails decision to build conventional toilets ysh
Show comments