नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका हद्दीतील गावठाण आणि झोपडपट्टी भागात कचरा गोळा करण्यासाठी सद्या:स्थितीत राबविण्यात येणाऱ्या घंटागाडी पद्धतीस पुरेशा प्रमाणात यश मिळत नसल्याने येत्या काळात या भागातील कचरा वाहतुकीची यंत्रणा प्रभावी पद्धतीने राबवली जावी यासाठी महापालिका प्रशासनाने नवी रचना उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या भागात लहान आकाराची ई वाहने तसेच गल्लीबोळातून कचरा गोळा करण्यासाठी अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांची कुमक ठेवली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेने तयार केलेल्या नव्या कचरा संकलन व वाहतूक निविदेत प्रथमच ई कचरा गोळा करण्यासाठी विशेष व्यवस्था असणार आहे. त्यासाठी २० ई वाहनांचा वापर केला जाणार आहे. शहर स्वच्छतेबरोबरच कचरा वर्गीकरणाकडे महापालिकेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा… उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवी मुंबईतील प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात; वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई अध्यक्षही शिंदे गटात

विविध पद्धतीचा कचरा वेगळा होणार

नव्या निवीदेत विविध पद्धतीचा कचरा वेगळा करण्याचा महापालिकेचा मानस आहे. यापूर्वी एकत्रित कचरा संकलन केले जात होते. नव्याने काढण्यात येणाऱ्या कामात शहरात ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाप्रमाणेच घरगुती घातक कचरा वर्गीकरण तसेच नव्याने प्लास्टिक, लाकूड, काच, धातू अशा कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा संकलन केले जाणार आहे. देशभरात सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर सुरू झाला असताना कचरा वाहतुकीसाठीही पालिकेच्या इतिहासात प्रथमच कचरा वाहतुकीसाठी २० छोट्या विद्याुत गाड्यांचा वापर केला जाणार आहे.

अत्याधुनिक पद्धतीने कचरा वाहतूक व संकलनासाठी वेगवान प्रक्रिया राबवून कचरा वाहतूक व संकलन निविदा काढण्यात येणार आहे. त्यासाठी ई वाहनांचाही वापर केला जाणार आहे. नव्या निविदेत मूळ गावठाण भागात ई वाहनाद्वारे कचरा गोळा होईल. – राजेश नार्वेकर, आयुक्त, नमुंमपा

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E vehicles for garbage collection in villages and slum areas within navi mumbai municipal corporation limits dvr