पनवेल : मानसिक दृष्ट्या दुर्बल मुलांसाठी एकता धावचे आयोजन खारघर येथे मंगळवारी सकाळी करण्यात आले. बौद्धिकदृष्ट्या वाढ थांबलेल्या तरुणांना समाजात अभिमानाने जगता यावे यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. अशा उपक्रमांना दानशूर व्यक्ती मदत करत आहेत. या तरुणांचे मनोबल अधिक प्रबळ करण्यासाठी भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर हेसुद्धा या एकता धावमध्ये सहभागी झाले होते. खारघर येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सशक्तीकरण संस्थेने या कार्यक्रमाचे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजन केले होते.
हेही वाचा – उरण : गोदामाच्या आगीत लग्नघर होरपळले, घराचे ३० लाखाचे नुकसान कोण भरून देणार?
नवी मुंबई राष्ट्रीय बौद्धिक विकास संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमात अडीचशेहून अधिक पालक व पाल्य सहभागी झाले होते. संस्थेचे कर्मचारीवर्ग तसेच शिक्षकांनी या एकता धावमध्ये भाग घेतला. १०० विशेष बालकांचा यात सहभाग होता. या एकता धावमध्ये खारघर परिसरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी स्वत:हून सहभाग नोंदविला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या विद्यार्थ्यांना एकतेची शपथदेखील दिली.