नवी मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीची लगबग संपून नवे सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे अनेक कामे पालिका स्तरावर खोळंबून होती. आता निवडणुकीनंतर या नागरी सुविधा कामांना गती मिळणार आहे. नवी मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपये किमतीची अनेक कामे पालिकेमार्फत केली जातात. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात असून त्यामुळे निविदा प्रक्रियांच्या कामकाजात येणार सुसूत्रता व गतिमानता येणार आहे. पालिकेने निविदांसाठी एक तांत्रिक समिती स्थापन केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रस्ते, पदपथ, गटारे, इमारती, नाले तसेच पाणी पुरवठा, मलनि:स्सारण, विद्युत अशी विविध प्रकारची नागरी सुविधा कामे करतांना अर्थसंकल्पातील संबधित लेखाशीर्षांतर्गत तरतूदी अन्वये तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर निविदा काढण्यात येतात. या निविदा प्रक्रियेत सुनियोजितपणा व गतीमानता येण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ निवृत्त शासकीय अधिका-यांची निविदा शर्ती, पूर्व अहर्ताबाबत तांत्रिक समिती स्थापन केली आहे. त्यामुळे पालिकेच्या विविध कामांसाठीच्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे.

हेही वाचा…करंजा रेवस सागरी पूल मार्गिकेला ग्रामस्थांचा आक्षेप, १९८० च्या नियोजन आराखड्यानुसार जोड मार्गिका देण्याची मागणी

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विविध विभागात कामांसाठी व नागरी सोयीसुविधांसाठी प्रस्तावित कामांच्या निविदा काढतांना त्यामध्ये कामाच्या स्वरुपानुसार काही बदल करण्यात येतात. या निविदा सादर करतांना प्रमाण निविदा बनवून निविदेत सारखेपणा येण्यासाठी प्रत्येक कामाची निविदा अद्ययावत शासन निर्णयाप्रमाणे शहर अभियंता यांच्या मंजूरीनंतर वृत्तपत्रामध्ये प्रसिध्दीसाठी पाठविण्यात येतात. निविदेच्या कार्यालयीन प्रक्रियेत अधिक सुसूत्रता व पारदर्शकता येण्यासाठी आणि कामाचा वेग वाढवून जलद निपटारा होण्याच्या दृष्टीने तसेच अर्थसंकल्पात नमूद कामे त्याच अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार पूर्ण होण्यासाठी कार्यनियोजन करण्यात आले आहे. त्यास अनुसरून प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक व पूर्ण झालेल्या निविदांच्या सर्व नस्ती संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत तपासून व छाननी करुन कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याकडे निविदा मंजूरीसाठी सादर करावयाच्या आहेत. या कामामध्ये सूसुत्रता येण्याकरिता व निविदाविषयक कागदपत्रे अद्ययावत करण्याकरिता निविदा शर्ती, पूर्व अहर्ता बाबतची तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये निवृत्त सचिव अथवा शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि समकक्ष मुख्य अभियंता या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्याचप्रमाणे सिडकोचे निवृत्त मुख्य अभियंता आणि महानगरपालिकेचे निवृत्त शहर अभियंता हे सदस्य असतील. महानगरपालिकेचे प्रकल्प नियोजन कार्यकारी अभियंता हे समितीचे सदस्य सचिव असतील.या निविदाविषयक तांत्रिक समितीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा-या नागरी सुविधा कामांमध्ये सुनियोजितपणा व पारदर्शकता येणार असून कामकाजाचा वेगही वाढणार आहे.

हेही वाचा…भाजीपाल्याची आवक वाढली, वातावरणातील उष्म्याने आठ दिवस आधीच उत्पादन

समितीत कोण?

निवृत्त सचिव अथवा शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि समकक्ष मुख्य अभियंता या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्याचप्रमाणे सिडकोचे निवृत्त मुख्य अभियंता आणि महानगरपालिकेचे निवृत्त शहर अभियंता हे सदस्य असतील. महानगरपालिकेचे प्रकल्प नियोजन कार्यकारी अभियंता हे समितीचे सदस्य सचिव असतील.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election code disrupted municipal works but civil facilities will progress now after elections sud 02