पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रात मतदारांना चुकीचे लघुसंदेश पाठवून त्यांची दिशाभूल करणाऱ्या एका अनोळखी व्यक्ती विरोधात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सक्तीचे पाऊल उचलले आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात रीतसर निवडणूक आयोगाचे काम करणाऱ्या पनवेल पालिकेच्या अधिकाऱ्याने तक्रार नोंदविली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये मतदार यादीतील जी नावे बाद झाली आहेत किंवा ज्या मतदारांच्या नावावर ‘डिलिट’ असा शिक्का लागला आहे अशा मतदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न एका अनोळखी व्यक्तीने केला आहे. ज्या मतदारांची नावे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलीत अशा मतदारांनी त्यांची जुनी मतदानकार्ड दाखविल्यास अशांना मतदानाची संधी मतदान केंद्रावर दिली जाईल असा लघुसंदेश सर्वत्र पसरविण्यात आला आहे.

हेही वाचा…मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आणि दुकानाच्या जाहिरातीसाठी पनवेलमधील व्यापाऱ्याची अनोखी शक्कल

या संदेशाविरोधात निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांत रितसर तक्रार केल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली. ज्या मतदारांना निवडणूक यादीतून बाद केले आहे अशांना निवडणूकीचा अधिकार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.