राज्यात पहिल्यांदाच बोटींग सफारीसाठी वनविभागाच्या ताफ्यात विद्युत बोट

नवी मुंबई</strong> : ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात पक्षीप्रेमी, पर्यटकांसाठी केंद्राला भेटी देण्याबरोबर खाडी क्षेत्रात दाखल होणाऱ्या फ्लेमिंगो पक्षाला पाहण्यासाठी बोटींग सफारी सुरू करण्यात आली आहे. सुरू केलेल्या बोटिंग सफारीला पर्यटकांकडून पसंती दिली जात आहे. या केंद्रात दोन बोट सेवेत दाखल आहेत. परंतु दिवसेंदिवस वाढणारा प्रतिसाद पाहता आणखीन बोट घेण्यात येणार असून पर्यावरण पूरक विद्युत बोट घेण्याचा विचार वनविभागाने केला. त्यानुसार निविदा प्रक्रिया झाली असून कामाची ऑर्डर देखील निघाली आहे. येत्या मार्चमध्ये ही विद्युत बोट या केंद्रामध्ये दाखल होणार आहे. अशी माहिती केंद्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली.

Food and Drug Administration seized 285 liters of adulterated milk in Mumbai news
मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mogra Udanchan Center, court, mumbai,
मोगरा उदंचन केंद्राचे काम मार्गी लागण्याची शक्यता, न्यायालयीन सुनावणीमुळे दोन वर्षे रखडलेला प्रकल्प वर्षाअखेरीस सुरू होण्याची शक्यता
136 artificial ponds for immersion build in navi mumbai
नवी मुंबईत यंदा १३६ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती; जलप्रदूषण टाळण्याचे आयुक्तांचे आवाहन
Roads Alibaug, MMRDA, Alibaug tourists,
अलिबागमधील दहा गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणार, एमएमआरडीए ३२५ कोटी रुपये खर्च करणार, पर्यटकांना दिलासा
Symbolic shutdown of food grain traders tomorrow wholesale and retail markets across the state closed
अन्नधान्य व्यापाऱ्यांचा उद्या लाक्षणिक बंद, राज्यभरातील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा बंद
Rasta Roko, Nashik, Sakal Adivasi community, PESA sector, recruitment, Forest Land Act, Panchayats Extension to Scheduled Areas Act
पेसा भरतीसाठी वणीत रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत

नवी मुंबई शहराला लाभलेला खाडी किनारा आणि जैवविविधता यांची महिती उपलब्ध होण्यासाठी ऐरोलीमध्ये किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले आहे. ठाणे ही आशिया खंडातील सर्वात मोठी खाडी आहे. २६ किलोमीटरच्या खाडी परिसरामध्ये २०० पेक्षा जास्त पक्षी स्थलांतर करीत असतात. फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही खाडी किनाऱ्यावर प्रत्येक वर्षी आश्रयाला येतात. नवी मुंबईसह, ठाणे, मुंबईतील पर्यावरण प्रेमींना खाडी किनाऱ्यांचे महत्त्व, जैवविविधतेची माहिती व किनाऱ्यांचे संरक्षण कसे करावे याची माहिती होण्यासाठी पक्षीनिरक्षण तसेच नौकाविहार म्हणजेच बोटींग सफर सुरू करण्यात आली आहे . या केंद्रात  २४ आसनी आणि ११ आसनी  अशा  २ बोट ताफ्यात आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ही सुविधा उपलब्ध आहे . मात्र करोनादरम्यांच्या कालावधीत काही वेळासाठी ही बोटींग सेवा बंद ठेवण्यात आली, होती परंतु निर्बंध सशिथील होताच पुन्हा सुरू करण्यात आली.  मागील वर्षी या पर्यटकांकडून बोटिंगसफारीला भरघोस प्रतिसाद मिळत होता. महिनाभर आधीच आगाऊ बुकिंग केले जात होती.  त्यामुळे वनविभागाने नवीन बोट घेण्याचा निर्णय घेतला होता. देशासह राज्यात तसेच नवी मुंबई शहरात ही पर्यावरण पूरक  विद्युत वाहने रस्त्यावर धावताना दिसत आहेत. वाढते पेट्रोल डिझेल दर तसेच पर्यावरण प्रदूषणामुळे पर्यावरण पूरक गोष्टींना अधिक महत्व दिले जात आहे. शहरात विद्युत बस, वाहने यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वनविभागाने ही विद्युत बोट खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून राज्यात प्रथमच ठाणे वन विभागाच्या ताफ्यात ही विद्युत बोट दाखल होणार आहे.

ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात स्विमिंग को पाहण्यासाठी दोन बोट आणि दोन पेट्रोलिंग बोट सेवेत दाखल आहेत विद्युत बोट सुरू करण्यात येणार असून याची निविदा प्रक्रिया झाली असून वर्क ऑर्डर देखील निघालेली आहे त्या मार्च अखेरपर्यंत ही बोट वनविभागाच्या ताब्यात दाखल होईल अशी अपेक्षा आहे

– प्रशांत बहादुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग ऐरोली सागरी जैवविविधता केंद्र