उरण : गुरुवारी दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास मोरा जेट्टीवर वीज कोसळल्याने येथील विजेचा खांब कळवंडला आहे. या घटनेमुळे जेट्टीवरील प्रवाशां मध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते. उरण परिसरात दुपारी दीड वाजता विजांचा कडकडाट सुरू झाला होता. त्याच्या बरोबरीने जोरदार पावसालाही सुरुवात झाली होती. याच दरम्यान ही वीज कोसळली. मोरा जेट्टीवरून दररोज मुंबई ते मोरा असा शेकडो प्रवासी प्रवास करतात. मात्र दुपारची वेळ असल्याने जेट्टीवर प्रवासी नव्हते त्यामुळे कोणताही अनुचित घडला नाही.या घटनेला पोलीसांनी दुजोरा दिला आहे.