|| जगदीश तांडेल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

४.५ कोटी रुपयांचा खर्च; अखंडित वीजपुरवठा होणार

उरण शहरात गेल्या अनेक वर्षांपासूनच्या विद्युत वाहिन्या असून त्या सडल्याने धोकादायक झाल्या आहेत. आता महावितरणने येत्या नवीन वर्षांत विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेतले आहे. याकरिता ४.५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

तीन ते चार महिन्यांत हे काम पूर्ण झाल्यानंतर उरण शहर लोंबकळणाऱ्या वीज तारामुक्त होणार आहे. तसेच यामुळे शहरातील विद्युतपुरवठाही नियमित येणार आहे. गेल्या ४० ते ५० वर्षांपासून उरणमध्ये असलेले विजेचे खांब व तारा या बदलल्या नव्हत्या. त्यामुळे त्या सडू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी खांब पडणे, तारा तुटण्याचे प्रकार घडत आहेत. दोन वर्षांपूर्वी तर शहरातील एका ठिकाणी जिवंत विद्युतवाहिनी बसवर कोसळली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र अशा घटना शहरात वारंवार घडत होत्या. अनेक ठिकाणच्या विद्युत जनित्रांनाही आग लागण्याच्या घटना घडल्याने भीतीचे वातावरण होते.

यामुळे शहरातील वीज सातत्याने गायब होत होती. त्यामुळे शहरातील व्यावसायिक, विद्यार्थी तसेच उद्योजक त्रस्त झाले आहेत. आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे मत उरणमधील व्यावसायिक मनोज ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

महावितरणचे अतिरिक्त अभियंता हरिदास चोंढे यांच्याशी संपर्क साधला असता, महावितरण कंपनीकडून उरण शहरातील विजेच्या तारा, खांब तसेच जुने झालेले जनित्र व इतर साहित्य बदलण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे नव्याने ४.५ कोटी रुपयांच्या निधीमधून वद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.