नवी मुंबई : वाशी-ठाणे मार्गावर तुर्भे-कोपरखैरणेदरम्यान ओव्हरहेडला होणारा विद्युतपुरवठा अचानक खंडित झाला. त्यामुळे लोकल बंद पडली. ही माहिती त्वरित मध्य रेल्वे प्रशासनाने उद्घोषणा करून प्रवाशांना दिली. या दरम्यान सुमारे वीस मिनिटे या मार्गावरील सर्व वाहतूक बंद ठेवावी लागली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नवी मुंबई: एपीएमसीतील आंब्याच्या हंगामावर एफडीएची करडी नजर

हेही वाचा – नवी मुंबई: बेशिस्त रिक्षा पार्किंग मुळे एकाचा जीव गेला

तीन वाजण्याच्या सुमारास विद्युतपुरवठा पूर्ववत झाल्यावर लोकल सुरू झाल्या. आज सुट्टीचा दिवस असल्याने प्रवासीसंख्या फार नव्हती. तसेच दुपारची वेळ असल्याने प्रवासीसंख्याही जास्त नसल्याने फार मोठा खोळंबा झाला नाही. मात्र बंद पडलेल्या लोकलमधून अनेक प्रवासी कोपरखैरणे रेल्वे स्टेशन नजरेच्या टप्प्यात असल्याने उतरून गेले होते. मात्र लांबच्या टप्प्याचे प्रवासी बसून राहिले. याबाबत माहिती देताना मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी सांगितले की, ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा तांत्रिक बिघाडाने बंद झाला होता. मात्र तीननंतर सर्व वाहतूक सुरळीत झाली.