आज नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात  सकाळी १० ते संध्याकाळी पाच पर्यंत वीज पुरवठा खंडित केला होता तशी पूर्वसूचना उशिरा का होईना दिली. मात्र पाच वाजता येणारी वीज सव्वा आठ वाजले तरी आली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज कोपरखैरणे भागातील  सेक्टर १४ ते २३ मध्ये देखभाल दुरुस्ती साठी वीज वितरणाने भारनियमन ( शट डाऊन ) जाहीर केले होते. हे भारनियमन सकाळी दहा ते पाच सात तासांचे होणार होते मात्र रात्री सव्वाआठ पर्यंत बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडीतच होता. सेक्टर १९ सी येथे साडे सातच्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाला मात्र पंधरा मिनिटात पुन्हा वीज गेली. 

हेही वाचा >>> नवी मुंबईत अतिरिक्त पाणी वापर करणाऱ्या ३३६ सोसायट्यांना पालिकेच्या नोटीसा

त्यात सध्या प्रचंड उकाडा जाणवत असल्याने  रहिवाशी अक्षरशः घामाने चिंब भिजले. या शिवाय सध्याच्या दिवसात शीतपेय आईस्क्रीम आदींची विक्री धडाक्यात होते मात्र एवढा वेळ वीज पुरवठा खंडित राहिल्याने फ्रीज मध्ये थंड काहीच राहिले नाही. याचा फटका शीतपेय , आईस्क्रीम विक्रेते हॉटेल चालकांना चांगलाच बसला. त्यात नेहमी प्रमाणे विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर महावितरण अधिकारी नॉट रिचेबल होतात तर लॅन्ड लाईन फोनलाही कोणी प्रतिसाद देत नसल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.