शुक्रवारी पावसाने नवी मुंबईला झोडपून काढले. या दरम्यान विद्युत पुरवठ्यावर त्याचा विपरीत झाला नाही, मात्र रात्री पासून अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तर, सकाळी सात पर्यंत काही ठिकाणी सुरू केला गेला. पूर्णपणे विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास दहा तरी वाजतील असे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई सुनियोजित शहर असले तरी आजही कोपरखैरणे, घणसोली सह सर्वच गावठाण भाग तसेच कोपरखैरणेतील अनेक सेक्टर भागात वीज पुरवठा व्यवस्थेने कात टाकलेली नाही. परिणामी वादळवारा पाऊस यासह विजेचा जास्तीचा वापर अशा कारणांनी वीज पुरवठा खंडित होतो. शुक्रवारी रात्री एक पासून सेक्टर १९ सी मध्ये (गावठाण भाग) बत्ती गुल झाली तर सकाळी साडेचार पाच च्या सुमारास घणसोली गाव, कोपरखैरणे सेक्टर १५ ते १८ मधील वीज पुरवठा खंडित झाला. यातील घणसोली गाव व कोपरखैरणे सेक्टर१९ च्या काही भागात वीज पुरवठा सुरू झाला.

हेही वाचा : ढगाळ वातावरणासह नवी मुंबईत दिवसभर पावसाच्या जोरधारा; रस्ते वाहतूकीवरही परिणाम

मात्र, विज पुरवठा कमी दाबाने असल्याने सकाळच्या वेळी कामाला घण्याच्या घाईत वापरण्यात येणारी मिक्सर, गिझर सारखी उपकरणे वापरता येत नसल्याने खोळंबा झाला आहे. या बाबत कोपरखैरणे विभाग महावितरण कार्यालयास विचारणा केली असता , या भागात जेथून वीज पुरवली जाते त्या वाशी फिडर मध्ये तांत्रिक खराबी झाली आऊन १० वाजेपर्यंत सर्व ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात आले.