वीज मंडळाच्या भांडूप विभागांतर्गत ठाणे जिल्ह्यातील मोठा शहरी भाग येतो मात्र शिक्षित अशा शहरी भागातही वीज चोरी सारखे गुन्हे घडतात. या नवी मुंबई सारखे सायबर सिटीही आघाडीवर आहे. भांडूप क्षेत्रात एप्रिल ते जानेवारी दरम्यान तब्बल ५ हजार ६७० वीज चोरीची प्रकरणे समोर आली असून त्यातून १८.४८ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा- आरोग्य, शिक्षणासाठी शासकीय खर्च होणे गरजेचे ! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
महावितरणची थकबाकी वाढत असून वीजबिल वसुलीवर विशेष लक्ष देणे सर्व परिमंडलांना भागच आहे. पण वीजेचा अनधिकृत वापर रोखणेही तितकेच महत्वाचे आहे. भांडूप परिमंडलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्न करून वीजबिल वसुलीवर भर देत आहेत. याशिवाय, वीज जोडणी तपासणी, ०-३० रीडिंग नोंदवत असलेल्या मीटरची तपासणी असे विविध उपक्रम सतत सुरु असतात. या तपासणी मध्ये भांडूप परिमंडलात माहे १ एप्रिल २०२२ ते १५ जानेवारी २०२३ पर्यंत विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ व कलम १३५ तसेच आकडा टाकून असे एकूण १८ कोटी ४८ लाखाची वीजचोरीची ५६७० प्रकरणे उघडकीस आली आहेत.
हेही वाचा- नवी मुंबई : कळंबोलीतील घरफोडीत २० तोळे सोने चोरी
भांडूप परिमंडलात १ एप्रिल २०२२ ते १५ जानेवारी २०२३ पर्यंत विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार भांडूप परिमंडलात ५०,१९,९४२ युनिटची ९ कोटी ८८ लाखाची वीजचोरी उघडकीस आली आहे. यामध्ये ठाणे मंडल कार्यालया अंतर्गत ६५४ प्रकरणात ३ कोटी २४ लाख, वाशी मंडल कार्यालयात १,०७५ प्रकरणात ४ कोटी ५७ लाख व पेण मंडल कार्यालयात ६८६ प्रकरणात २ कोटी ०६ लाखाची वीजचोरी पकडली आहे. याशिवाय, विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ नुसार ठाणे मंडल कार्यालयात १७०१ प्रकरणात ४ कोटी ११ लाख, वाशी मंडल कार्यालयात ६४६ प्रकरणात २ कोटी ३२ लाख तर पेण मंडल कार्यालयात २६१ प्रकरणात ७३.४८ लाख असे एकूण २६०८ प्रकरणात ७ कोटी १८ लाखाचा अनधिकृत विजेचा वापर आढळून आला आहे. या शिवाय आकडा टाकून वीजचोरी करण्याचे ६४७ प्रकरणे समोर आली आहे. या मध्ये १ कोटी ४२ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे.
हेही वाचा- एपीएमसी बाहेरील बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासनाचा कारवाईचा इशारा
वीजचोरी रोखणे हे महावितरणपुढे एक मोठे आव्हान आहे. महावितरणने वीज चोरांवर तीव्र कारवाई सुरु केली असून ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे प्रामाणिकपणे भरले पाहिजे. वीजचोरी सारख्या अनधिकृत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांनविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवाईत वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना दंड व कठोर शिक्षा होऊ शकते. ग्राहकांनी वीजचोरी सारख्या कृत्यापासून दूर राहावे” असे आवाहन भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले.