उरण: शहरातील वाहनतळाच्या अभावामुळे वाहतूक कोंडीत वाढ झाली असून या कोंडीत फेरीवाल्यांनी बाजारातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण सुरू केल्याने यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे उरण शहरात बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या समस्येतही वाढ झाली आहे. अशा रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी उरणमधील नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा >>> सूर्यनारायणाच्या अस्तानंतरही पथदिवे बंदच; नवी मुंबईत नागरिकांकडून संताप व्यक्त

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

उरण शहरातील उरण करंजा मार्गावरील बालई रस्ता ते पालवी हॉस्पिटल तसेच उरण चारफाटापर्यंतच्या रस्त्यावर फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. सुरुवातीला हे फेरीवाले फुटपाथ पर्यंत मर्यादित होते. ते आता रस्त्यात हातपाय पसरू लागले आहेत.आधीच अरुंद असलेल्या शहरातील रस्त्यात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची गर्दी होऊ लागली आहे. 

हेही वाचा >>> घारापुरी किनारी मृत ब्लू व्हेल मासा

उरण शहराचा विस्ताराला मर्यादा असल्यास तरी शहराशेजारी असलेल्या गावांचा विस्तार होत आहे. परिणामी शहर आणि शहरालगतची वदर्ळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे उरण शहरात सातत्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन बाजारात येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. यामध्ये सुट्टीच्या दिवशी गर्दीत वाढ होत असल्याने या अतिक्रमण झालेल्या भागात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. उरण शहरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपरिषदे ने एका पथकाची स्थापना केली असून त्यांच्या कडून उरण मधील फेरीवाल्यांची अतिक्रमणे हटविण्यात येतील अशी माहिती उरण नागरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी दिली आहे.