लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल : खासगी विकसक कंपनी हिरानंदानी समुहाच्या विविध कार्यालयांवर गुरुवारीसकाळपासून सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धाडी टाकल्या आहेत. हिरानंदानी समुहाच्या पनवेल, नरीमन पॉईंट, पवई, मलबारहिल येथील कार्यालयांवर हे धाडसत्र सुरु होते.

आणखी वाचा-उरण : नवघर उड्डाणपुलावर खड्डे, अंधारामुळे अपघातांचा धोका

परकिय चलन व्यवस्थापनातील(फेमा) नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ईडीच्या तपास अधिकाऱ्यांनी कार्यालयांवर धाडी घातल्या. पनवेल येथे मोठ्या प्रमाणात हिरानंदानी सुमहाचे काम सुरु आहे. हिरानंदानी सीटीमध्ये घरे विक्रीसाठीकंपनीच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन कार्यालयातील महत्वाची कागदपत्र, संगणकावरील माहिती तपासण्याचे काम सुरु केले. सायंकाळी उशिरापर्यंत तब्बल आठ तास हे तपासणी मोहीम सुरु होती.