38 Year Old Jumps Off Atal Setu : नवी मुंबईतल्या अटल सेतूवर कार थांबवत एक तरुण खाली उतरला, त्याने इकडे तिकडे पाहिलंही नाही. अवघ्या काही सेकंदात समुद्रात उडी घेतली आणि आयुष्य संपवलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मार्च महिन्यात किंजल शाह या महिला डॉक्टरने याच अटल सेतूवरुन उडी मारत आयुष्य संपवलं होतं. आता पुन्हा अशीच घटना घडली आहे. त्यामुळे अटल सेतू (Atal Setu ) या आत्महत्येच्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. तसंच या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुधवारी नेमकं काय घडलं?

करुतुरी श्रीनिवासन हा तरुण त्याच्या टाटा नेक्सॉन कारने अटल सेतूवर ( Atal Setu ) आला. त्याने काहीही कळायच्या आत अवघ्या काही सेकंदात उडी मारली. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. हा तरुण डोंबिवलीचा आहे. तो त्याच्या कार क्रमांक MH O5 EV 0849 मधून उतरला आणि अवघ्या काही सेकंदात खवळत्या समुद्रात स्वतःला झोकून दिलं. श्रीनिवासन हा कुवेतमध्ये नोकरी करत होता. मात्र वैफल्य आल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

व्हायरल व्हिडीओत काय दिसतं आहे?

करुतुरी श्रीनिवासन हा तरुण अटल सेतूवर ( Atal Setu ) कार थांबवतो. त्यानंतर तो कारमधून उतरतो. काहीही कळायच्या आत अवघ्या काही सेकंदात तो समुद्रात उडी मारतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हे पण वाचा- Shyam Manav: “..तर अनिल देशमुख यांनी आत्महत्या केली असती, त्यांनी…”, श्याम मानव यांचा दावा

श्रीनिवास कुरुकुट्टी कुवैत येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. मात्र ऑक्टोबर महिन्यात नोकरी सोडून डोंबिवलीत ते त्यांचा व्यवसाय करत होता. आर्थिक अडचणींमुळे तो तणावात होता. मंगळवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास ते चारचाकी गाडीतून अटलसेतूवर आले आणि सेतूवरुन थेट खवळलेल्या समुद्रात उडी घेतली. याआधी कुवेतमध्येही या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

अटल सेतूवरुन उडी मारत तरुणाची आत्महत्या

काही दिवसांपूर्वी नालासोपारा या ठिकाणी वडील आणि मुलाने रेल्वे ट्रॅकवर झोकून देत आयुष्य संपवलं. शेअर बाजारात नुकसान झाल्याने या दोघांनी आयुष्य संपवल्याची घटना समोर आली होती. आता अटल सेतूवरुन उडी मारत डोंबिवलीतल्या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेमुळे अटल सेतू चर्चेत आला आहे.