प्रतिनिधी,लोकसत्ता

नवी मुंबई: नेरुळ येथील वंडर्स पार्क नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे मुंबई या परिसरातील शहरातील अबाल वृद्धांचे महत्वपूर्ण प्रेक्षणीय ठिकाण आहे. सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या पार्कमध्ये नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या आकर्षक खेळण्यांची,आकर्षक कारंजे तसेच लेझर शो ची व्यवस्था कण्यात आली असून ह्या पार्कचे उद्घाटन कधी होणार याची उत्सुकता नवी मुंबईकर व आजुबाजुच्या महापालिकांमधील नागरीकांना आहे. पुढील दोन चार दिवसात उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती एकीकडे शहर अभियंता यांनी दिली असून दुसरीकडे याच पार्कमध्ये आकर्षक दिवे लावण्याचे काम झाले असताना पालिकेच्या विद्युत विभागाच्या अभियंत्यांची कंपनीच्यावतीने लावण्यात आलेल्या विद्युत साहित्याची कोणती तपासणी करण्यासाठी ही बॅंकॉक वारी आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Jaipur railway track incident thar stuck in drunken misadventure shocking video goes viral
VIDEO: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली थार; तितक्यात पाठीमागून मालगाडी आली अन्…थरारक शेवट
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
"Worked Overtime": Gen Z Employee's Excuse For Coming Late The Next Day Boss and employee chat viral on social media
PHOTO: “मी उद्या उशीराच येणार…” कर्मचाऱ्यानं बॉसला मेसेज करत थेटच सांगितलं; चॅट वाचून नेटकरी म्हणाले “बरोबर केलं जशास तसं”
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

नवी मुंबई करांचे आकर्षण असलेले वंडर्स पार्क मागील अडीच वर्षापेक्षा अधिक काळ सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे हे पार्क कधी सुरु होणार याची उत्सुकता अबालवृध्दांना आहे. त्यामुळे आता उद्घाटनाचा मुहूर्त नक्की कधी साधणार व पार्क कधी सुरु होणार असा प्रश्न पडला असून याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा… नवी मुंबई : खोदकामांसाठीची २५ मे ची मुदत संपली, तरीही शहरात खोदकामे सुरुच…

मेकओव्हर करण्यात आलेल्या वंडर्स पार्कमध्ये असलेली आकर्षक खेळणी, जगातील सात आश्चर्य दाखवणाऱ्या प्रतिकृती यासह अँम्पीथिएटर याबरोबरच आकर्षक तलाव, खेळण्यासाठी असलेली प्रशस्त खेळण्याची जागा यामुळे त्यातच नव्याने करण्यात आलेल्या म्युझिकल फाऊंटन लेझर शोसहित, ऑडिओ व्ह्युजअल यंत्रणा, तलावांची दुरूस्ती, वॉक वे सुधारणा, नव्याने विविध खेळांच्या साहित्याचे तसेच खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे, सर्व ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसविणे, प्रवेशद्वारावर बायोमॅट्रीक मशीन लावणे, नवीन आकर्षक विद्द्युत दिवे लावणे अशी जवळजवळ ३० कोटीच्या खर्चातून पार्कचे मेकओव्हर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वानाच या पार्कची उत्सुकता आहे. या पार्कमध्ये लावण्यात आलेले दिवे तसेच लेझर शो व इतर विद्युत उपकरणे ही समर्थ इलेक्ट्रीकल यांच्यातर्फे लावण्यात आलेली आहेत.

हेही वाचा… HSC Result : यंदा शाळांच्या निकालात घसरण, मागील वर्षी ३२ शाळा तर यंदा ११ शाळांचा १०० टक्के निकाल

संबंधित कंपनीने आकर्षक दिवे व विद्युत साहित्य हे बॅंकॉक येथे स्थित असलेल्या कंपनीतून घेतली आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या कंपनीतील साहित्याची इन्सेप्कशन करण्यासाठी दोन अभियंता बॅंकॉककडे रवाना झाले आहेत. त्यामुळे वंडर्स पार्कमध्ये विद्युत विभागाकडून काम पूर्ण झाल्यानंतर बॅंकॉकमध्ये आता कसले इन्सेप्कशन होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. बॅंकॉकला जाण्याचा खर्च कंपनीच्यावतीने करण्यात येत असला तरी दोन अभियंत्यांच्या बॅंकॉकवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

“वंडर्स पार्कमध्ये लावण्यात आलेल्या विद्युत उकरणांची निर्मिती करणारी कंपनी बॅंकॉंकमध्ये आहे. नियमानुसार कंपनी साहित्याची इन्सेप्कशन करण्यासाठी दोन पालिका अभियंत्यांना बॅंकॉंकला पाठवण्यात आले आहे. यापूर्वीही असे इनस्पेक्शन करण्यासाठी अभियंते पाठवण्यात आले होते.”
– संजय देसाई, शहर अभियंता