नवी मुंबई – नेरुळ येथील वंडर्स पार्क नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे मुंबई या परिसरातील शहरातील अबाल वृद्धांचे महत्त्वाचे प्रेक्षणीय ठिकाण आहे. सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या पार्कमध्ये विविध दुरुस्तीची तसेच नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या आकर्षक खेळांची व्यवस्था सज्ज आहे. कधी एकदा हे पार्क सुरू होणार याची अबालवृद्धांना उत्सुकता आहे. परंतु, नव्या रुपात सुरू होणाऱ्या या वंडर्स पार्कचे प्रवेशदर वाढवण्यात येणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत. करोनाकाळापासून जवळजवळ ३ वर्षांपेक्षा अधिक काळ हे पार्क बंद आहे. त्यामुळे पार्क कधी सुरू होणार याची उत्सुकता बच्चेकंपनीसह पालकांना आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभियंता व विद्युत कामात झालेल्या प्रशासकीय दिरंगाईमुळे काम पूर्ण होण्यास वेळ लागला. आता या पार्कचे काम पूर्ण झाले असून पालिका उद्घाटनासाठी तयार असल्याचे चित्र आहे. नेरुळ येथील वंडर्स पार्कचे मेकओव्हर करण्यात आले आहे. नव्याने करण्यात आलेल्या म्युझिकल फाऊंटन लेझर शोसहित, ऑडिओ व्हीज्युअल यंत्रणा नविन बसविणे, तलावांची दुरुस्ती, वॉक वे सुधारणा, नव्याने विविध खेळांच्या साहित्याचे तसेच खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, प्रवेशद्वारावर बायोमॅट्रीक मशीन लावणे, नवीन विद्युत दिवे लावणे. उद्यानात आकर्षक कारंजे अशी जवळजवळ २७ कोटींपेक्षा अधिकच्या खर्चातून वंडर्स पार्कचे पूर्णतः मेकओव्हर करण्यात आले आहे. त्यामुळे या उद्यानाचे प्रवेशमूल्य वाढवण्याचे पालिकेने प्रस्तावित केले आहे. उद्यानात नवी मुंबईसह ठाणे, खारघर, उरण, पनवेल येथून टॉय ट्रेन तसेच विविध खेळण्यांची मजा घेण्यासाठी नागरीक येतात. आता पार्कमधील खेळण्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : एपीएमसीत डाळी महागल्या , दरात २% ते ३% वाढ

स्मार्ट कार्ड मिळणार

नव्याने सुरवात होणाऱ्या वंडर्स पार्कच्या प्रवेशासाठी नागरीकांना स्मार्ट कार्ड दिले जाणार आहेत. स्मार्ट कार्डसाठी सुरक्षा ठेव १०० रुपये आकारण्यात येणार असून नागरीकांनी त्यामध्ये हवी तेवढी रक्कम ठेऊन प्रवेशाबरोबरच विविध खेळण्यांसाठी स्मार्ट कार्डद्वारे आकारणी देता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगळी तिकीट घ्यावी लागत होती. परंतु आता या कार्डद्वारे आकारणी करता येणार आहे.

लेझर शो व म्युझिकल फऊंटनची धमाल

नव्याने सुरवात करण्यात येत असलेला लेझर शो आकर्षक असून, फाऊंटनमध्येच रंगीत पाण्यामध्येच शिवाजी महाराजांसह तिरंगा व अनेक आकार पाहता येणार आहे. तसेच संगीतावर नृत्याचा ताल धरता येणार आहे.

हेही वाचा – रायगडला ‘टुरिस्ट हब’ बनवण्याची गरज, प्रसिद्ध पर्यटनस्थळांच्या परिसरात आकर्षक सुविधा उभारणे आवश्यक असल्याचा सूर

पालिकेचे प्रस्तावित दर

वयोगट, सध्याचे दर, नवे दर

५ ते १२ वर्ष – सध्याचे दर – २५, नवे दर – ४०
१२ वर्षावरील – सध्याचे दर – ३५, नवे दर- ५०
राईड्स शुल्क – सध्याचे दर – २५, नवे दर – २५
टॉय ट्रेन शुल्क – सध्याचे दर – २५, नवे दर – २५
जॉगिं पास – सध्याचे दर – ५०, नवे दर – ५०
दुचाकी पार्किंग – सध्याचे दर – १०, नवे दर – १०
चारचाकी पार्किंग – सध्याचे दर – ५०, नवे दर – ५०
शाळा वाहन पार्किंग – सध्याचे दर – ५००, नवे दर – ५००
स्मार्ट कार्ड सुरक्षा ठेव – १०० रुपये

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने शहराचे व आजुबाजूच्या शहरांचे आकर्षण असलेल्या या पार्कला नवे रूप देण्यात आले आहे. विविध खेळण्यांची संख्या वाढवली आहे. तसेच लेझर शो, तसेच आकर्षक फाउंटरन व संगीत यांचा आनंद नागरीकांना घेता येणार आहे. त्यामुळे नवे दर निश्चित करण्यात येत आहेत. शहराला नवा लूक देणारे हे पार्क सर्वांचे अधिक आकर्षणाचे केंद्र बननार आहे. लवकरच हे पार्क सुरू करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. – राजेश नार्वेकर, आयुक्त नवी मुंबई महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entrance to wonders park which is the attraction of navi mumbai city will be expensive ssb