नेरूळ येथील आर. आर. पाटील उद्यानातील प्रवेश शुल्कवसुली अडीच वर्षे बंद
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नेरूळ सेक्टर १९मधील आर. आर. पाटील उद्यानात प्रवेशशुल्क आकारणीचा प्रस्ताव मंजूर होऊन अडीच वर्षे उलटल्यानंतरही प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे वर्षांकाठी सुमारे एक लाख रुपयांच्या महसुलावर पालिका पाणी सोडत आहे. पालिकेने या उद्यानासाठी तसेच कोपरी गावातील मनोरंजन उद्यानासाठी (अॅम्युझमेंट पार्क) शुल्क आकारणी व उद्यानासाठी शुल्क आकारणीचा प्रस्ताव मंगळवारी महासभेत मांडण्यात आला आहे. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी प्रस्ताव मंजूर होऊनही अद्याप अंमलबजावणी का केली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महानगरपालिकेने माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या नावाने नेरूळ सेक्टर १९ मध्ये १२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर आर. आर. पाटील उद्यान उभारले आहे. ८०० मीटरचा जॉगिंग ट्रॅक, योगा पार्क, मुलांसाठी खेळणी, पाच मीटर त्रिज्येचे सौरघडय़ाळ बसविण्यात आले आहे. ७ नोव्हेंबर २०१५ला उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. २० नोव्हेंबर २०१५ ला सर्वसाधारण सभेने उद्यानामध्ये लहान मुलांसाठी पाच रुपये व प्रौढ व्यक्तींसाठी दहा रुपये प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या होत्या. परंतु ठराव मंजूर होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ उलटल्यानंतरही अद्याप शुल्कआकारणी सुरू झालेली नाही. दररोज मोठय़ा संख्येने नागरिक उद्यानात येतात. सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका व व्यायामासाठी येणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पालिकेचा २ वर्षांचा महसूल बुडाला आहे.
उद्यान विभाग व प्रशासनाच्या नियोजनाअभावी तिकीटविक्रीच सुरू झालेली नाही. तिकीट विक्रीसाठी कर्मचारी उपलब्ध होत नसल्याचे कारण दिले जात होते. त्यामुळे तीन हजार कोटींहून अधिक रकमेचा अर्थसंकल्प असणाऱ्या महापालिकेस दोन कर्मचारी उपलब्ध होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंगळवारच्या महासभेत नेरूळमधील आर.आर.पाटील उद्यानाबरोबरच कोपरी गावातील सेक्टर २६ येथे नव्याने उभारलेल्या मनोरंजन उद्यानातही शुल्कआकारणी व उद्यानाचे सर्वसमावेशक संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
शुल्क आकारणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परंतु त्यातून मिळणारे शुल्क व खर्च यात मोठी तफावत आहे. संपूर्ण उद्यानाचा सर्वसमावेशक संरक्षण व संवर्धनाचा प्रस्ताव आता मांडण्यात आला आहे. आर. आर. पाटील उद्यानाच्या मंजूर शुल्कआकारणी प्रमाणेच कोपरी येथील उद्यानातही प्रवेशशुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आर. आर. पाटील उद्यान अभियंता विभागाकडून उद्यान विभागाकडे हस्तांतरित करण्यासही विलंब झाला होता.
– तुषार पवार, उपायुक्त, उद्यान विभाग, नमुंमपा
नवी मुंबई महानगरपालिकेने आर. आर. पाटील उद्यानामध्ये लहान मुलांकडून पाच रुपये व प्रौढ नागरिकांकडून दहा रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. परंतु प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. कर्मचारी उपलब्ध होत नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत होती. परंतु आता उद्यानाच्या शुल्कवसुलीसह संपूर्ण संरक्षण व संवर्धनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
– रवींद्र इथापे, सभागृह नेता, नमुंमपा