नवी मुंबई: नवी मुंबई सीवूड्स येथील टी एस चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे असलेला चाणक्य तलाव हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संरक्षित क्षेत्र केलेला आहे. परंतु या तलावाकडे सिडको जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. भरती – ओहोटी प्रभावित, १४.७४ हेक्टर क्षेत्र व्यापलेला चाणक्य तलाव आणि त्याच्या आजूबाजूचे खारफुटीचे क्षेत्र सिडकोच्या अधिपत्याखाली येते. या परिसरातील संपूर्ण ३२ हेक्टर क्षेत्र बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन तेथील तलाव बुजवून टोलेजंग इमारती बांधण्याचा घाट सिडकोच्या मदतीने सुरु असल्याचा दावा निसर्गप्रेमी यांनी केला असून दर रविवारी या परिसरात पर्यावरणप्रेमींचे आंदोलन करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाणक्य तलाव बुजवून या ठिकाणी १७ टोलेजंग इमारती उभारण्याचा घाट घातला जात असून मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोला आपल्या ताब्यातील सर्व खारफुटी प्रदेश वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देऊनही, सिडकोने जाणीवपूर्वक संपूर्ण ठाणे खाडी हस्तांतरण करण्यास टाळाटाळ करत असून खासगी विकसकांच्या मार्फत अनधिकृतपणे तलाव बुजवण्याचा प्रकार सुरु आहे. याविरोधात दर रविवारी निसर्गप्रेमीं चाणक्य तलाव वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत.

हेही वाचा… अटल सेतूवर टोलमुक्त प्रवासाचा वीकेंड

चाणक्य तलावातील १२५ कांदळवन झाडे तोडली हळूहळू तलाव बुजवून १७ इमारती उभ्या करण्याचा डाव असून या विरोधात चाणक्य तलाव वाचवण्यासाठी आंदोलन केले असल्याची माहिती पर्यावरणप्रेमींनी दिली आहे. नुकतीच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या तलावाची पाहणी करत पर्यावरणाचा ऱ्हास करुन विकास काय कामाचा असा सवाल करत सिडकोला याबाबत जाब विचारणार असून पर्यावरणावर घाला घालणाऱ्या प्रकल्पांना विरोध करण्याचा इशारा दिला आहे.

टी एस. चाणक्य खाडी किनारी हजारो फ्लेमिंगोंचा दरवर्षी अधिवास पाहायला मिळतो. परंतु याच ठिकाणी सातत्याने छुप्या पध्दतीने कांदळवन नष्ट करण्याचा प्रकार केला जात आहे. मे २०२३ ला ठाणे खाडीला विशेष संरक्षित क्षेत्र जाहीर केले आहे. परंतु चाणक्य तलावाच्या देखभाल व सुरक्षेकडे सिडकोने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. खासगी बिल्डरच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली असून चाणक्य तलाव हॉटेल आणि निवासी टॉवर्सच्या बांधकामासाठी विकण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. चाणक्य तलावा बाजूकडील १२५ हून अधिक निरोगी, पूर्ण वाढलेली खारफुटीची झाडे रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी निर्दयीपणे तोडली आहेत.या विरोधात स्थानिक व पर्यावरणप्रेमींमध्ये संताप असून हा तलाव बुजवण्यासाठीचा घाट घातला असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला त्या विरोधात रविवारी आंदोलन केले जात आहे.

२४ डिसेंबर २०२३ पासून दर रविवारी सेव्ह नवी मुंबई एन्व्हायर्मेंटचे सुनील अग्रवाल आणि एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशनचे धर्मेश बाराई तसेच विविध पर्यांयावरण बचाव संस्था यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत असून कोणत्याही प्रकारे या ठिकाणी पक्षांचाअधिवास नष्ट करु दिले जाणार नसल्याचा पर्यावरणप्रेमींनी केला आहे.नवी मुंबई पर्यावरण संवर्धन संस्था, एनव्हायमेंट लाईफ सोलजर्स, पर्यावरण दक्षता मंडळ, येऊर एव्हायरंमेंटल सोसायटी, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी , राष्ट्र सेवा योजना यांच्यामार्फत विविध तलाव परिसरात स्वच्छता मोहीमे बरोबरच चाणक्य तलाव बचाव मोहिम राबवण्यात येत आहे.

कांदळवन बचावासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहणार असून शासकीय संस्था जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. रात्रीच्या अंधारात १२५ खारफुटी जोतली असून टप्प्याटप्प्याने कांदळवनावर घाला घालून या परिसरात खासगी विकासकाचा तलाव बुजवून १७ इमारती उभारण्याचा डाव आहे. त्याला शासकीय संस्थांनी विरोध केला पाहीजे. चाणक्य तलाव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असून सरकारी अधिकाऱ्यांना पकडून मनमानी व नियम पायदळी तुडवून चाणक्य तलाव बुजवण्याचा घाट यशस्वी होऊ देणार नाही. – सुनील अग्रवाल, सेव्ह एन्हव्हायरमेंट

नियमांचा व सरकारी आदेशाचाही बट्ट्याबोळ… चाणक्य तलाव वाचलाच पाहीजे…

टी एस .चाणक्यच्या मागील पाणथळ जागा असून हा फ्लेमिंगोचा महत्त्वाचा पक्षी अधिवास आहे. आता १२५ कांदळवन झाडे तोडली उद्या तलाव बुजवतील त्यामुळे निसर्गाची हानी करणाच्या व सिडकोच्या धोरणाबाबतच प्रश्नचिन्ह आहे. तलाव बुजवून टोलेजंग इमारती उभारण्याला सातत्याने विरोध केला जाईल. – समीर बागवान, पदाधिकारी, उध्दव बाळासाहेब ठाकरे गट

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environment lovers are protesting in chanakya area every sunday against cidco to save chanakya lake in seawoods navi mumbai dvr
Show comments