लोकसत्ता प्रतिनिधी,

उरण : उष्णतेची लाट सुरू असून माणसाला या उष्म्याच्या झळा सोसाव्या लागत असतांना वन्यजीवांची काळजी करीत चिरनेरमधील जंगलात कोरड्या पडलेल्या पानवठ्यात ड्रमने पाणी वाहून नेत हे पाणवठे भरले जात आहेत.

उरणच्या निसर्गप्रेमी आणि पर्यावरणवादीच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. सध्या पारा ४० अंश पार जाऊ लागला आहे. त्यामुळे घरातून कामाशिवाय बाहेर पडू नका, उष्णतेपासून संरक्षण करा, उन्हाळ्यात सुरक्षा म्हणून साहित्य वापरा आदी सूचना केल्या जात आहेत. मात्र माणसा प्रमाणेच या निसर्गाचा भाग असलेल्या वन्यजीवांच्या जीवलाही या वाढत्या उष्णतेची झळ पोहचत आहे.

आणखी वाचा-यांना उमेदवार मिळेना, मग लढणार कसे? – सुषमा अंधारे 

जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत कमी झाले आहेत किंवा नष्ट केले आहेत. त्यामुळे वन्यजीवाची होणारी काहिली थांबविण्यासाठी चिरनेरच्या फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेचे संस्थापक जयवंत ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ड्रमच्या सहाय्याने दुरून पाणी वाहून आणीत कोरडे झालेले पाणवठे पुन्हा भरण्याचे काम सुरू केले आहे.

Story img Loader