लोकसत्ता टीम

उरण : शेतकरी प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्र यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना न्याय देण्यासाठी सर्व भूमिपुत्रांच्या संघटनांनी एक होऊन प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दि.बा. पाटील यांचे भूमिपुत्रांना न्याय देत त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आवाहन महासंघाचे अध्यक्ष कॉ. भूषण पाटील यांनी जासई मधील स्थापना समितीच्या बैठकीत केले. यावेळी त्यांनी महासंघाच्या वतीने पुढील काळातील आंदोलनाची घोषणा करण्यात आली. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या विमानतळाच्या नावाची घोषणा करण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!

आणखी वाचा-खारकोपर-उरण मार्गाची रेल्वेच्या मुख्यकार्यकारी अधिकऱ्यांकडून पाहणी

शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्यावर महासंघअंतर्गत संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये २० फेब्रुवारी ला ९५ गावांचे महाधरणे आंदोलन सिडको भवन समोर ४ ते १६ मार्चला सिडकोभवनला साखळी उपोषण करण्यात येईल. तर १७ मार्च या सिडकोच्या स्थापना दिनी सिडको भवन ते मंत्रालय लॉंगमार्च काढण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष कॉ. भूषण पाटील,कार्याध्यक्ष दीपक पाटील, सरचिटणीस सुधाकर पाटील, सरचिटणीस, उपाध्यक्ष एड. विजय गडगे, समन्वयक एड. दीपक ठाकूर, यांनी दिली आहे. यावेळी जासई बैठकीत कामगार नेते सुरेश पाटील,वंदना गौरीकर आदीजण उपस्थित होते.

Story img Loader