मोरा ते मुंबई जलप्रवास विना अडथळा सुरू रहावा यासाठी चार महिन्यांपूर्वी मोरा बंदरातील गाळ काढण्यासाठी चार कोटी खर्च आला होता.मात्र बंदरात गाळाची समस्या कायम राहिल्याने मागील चार दिवसांपासून ठराविक काळावधीसाठी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. वारंवार कोट्यावधींच्या खर्चानंतरही गाळाची समस्या कायम राहिल्याने प्रवासी आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मोरा बंदरातून भाऊचा धक्का येथुन मुंबईत पोहोचण्यासाठी अवघा एक तास लागतो.प्रदूषण, वाहतूक कोंडी आदी त्रासापासून दूर ठेवणारा अत्यंत जवळचा आणि फक्त ८० रुपयात मुंबईत पोहचवणारा स्वस्त अशी मोरा -भाऊचा धक्का सागरी मार्गाची ओळख आहे.मात्र गाळामुळे ओहटीच्या वाहतूक बंद होण्याची सर्वात मोठी समस्या बंदरात आहे. बंदरात सातत्याने गाळ साचत असल्याने समुद्राच्या ओहोटीच्या वेळी प्रवासी बोटीमोरा बंदरात प्रवासी गाळात रुतून बसतात.
त्यामुळे प्रवाशांना घेऊन येणाऱ्या प्रवासी बोटी बंदरापर्यत पोहचू शकत नाहीत.त्यामुळे समुद्राच्या ओहोटीच्या वेळी प्रवासी बोटी ठराविक काळावधीसाठी बंद ठेवण्यात येतात.त्यामुळे दररोज कामासाठी मुंबईत जाणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असते.
गाळामुळे सातत्याने विस्कळीत होत असलेली उरण-भाऊचा धक्का प्रवासी लाँचसेवा सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र बंदर विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून मोरा बंदरातील गाळ काढण्यात येतो.
हेही वाचा : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सकाळपासून वीज गायब
मात्र त्यानंतरही मोरा बंदर गाळाने भरण्याचे थांबलेले नाही.दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा देण्यासाठी या वर्षीही मागील मे- जून महिन्यात चार कोटी खर्चून एक लाख १८ हजार ९२७ क्युबिक मीटर साचलेला गाळ काढण्यात आला होता.मात्र चार महिन्यांपूर्वी गाळ काढण्यात आल्यानंतरही मोरा बंदरगाळाने भरण्याचे थांबलेले नाही.मोरा बंदरात साचलेल्या गाळामुळे २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान सलग चार दिवस प्रवासी वाहतूक ठराविक काळावधीसाठी बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली.