पनवेल: नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्र म्हणजे नैना क्षेत्रातील शेतकरी मागील ६ दिवसांपासून सरकारविरोधात पनवेल तालुक्यातील गोवा मुंबई महामार्गावर तुरमाळे गावाजवळ आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र सरकारच्या प्रतिनिधी आणि सिडको मंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांकडे लक्ष न दिल्याने सोमवारी शेतकरी आक्रमक झाले. उपोषण ठिकाणी जमललेल्या महिलांनी चर्चेसाठी सरकारने प्रतिसाद न दिल्यास आत्मदहनाचा निर्णय जाहीर केल्याने एकच खळबळम माजली. मुंबई गोवा महामार्गालगत हे शेतकरी आंदोलन करत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी मोठा फौजफाटा या परिसरात उभा केला आहे. सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सिडको आणि नैनाचे वरिष्ठ अधिकारी किंवा प्रांत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास शेतकरी आक्रमक होतील, अशी चर्चा या परिसरात सूरु आहे. महाविकास आघाडीमधील सर्वच घटक राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष या आंदोलनापासून दूर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा