नवी मुंबई – मुंबई विस्तारली व नव्याने नवी मुंबई शहर निर्मितीस आले. आता नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ आकारास येतय. त्यामुळे वाढत्या शहरासाठी पनवेल पालिकेची स्थापना झाली. पण याच विमातळामुळे महामुंबईचा विस्तार रायगड जिल्हापर्यंत पोहोचलाय. वाढणाऱ्या व विकसित होणाऱ्या शहराची सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे पाणी. याच पाण्याबाबत नियोजनबद्ध महामुंबईसुद्धा जलसंपन्न ठरणार असल्याचा विश्वास याच ठिकाणी काम करणाऱ्या शासनाच्याच आस्थापनांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात महामुंबईतही पाण्याची चिंता नको. त्यामुळे हे महामुंबई शहरही जलसंपन्नच ठरणार आहे.

रायगड, ठाणे, पुणे, रत्नागिरी अशा चार जिल्ह्यांपर्यंत पसरलेल्या सीमा त्यालाच लागून सह्याद्रीचे खोरे आणी अथांग अरबी समुद्राची साथ लाभलेल्या रायगड जिल्ह्यात होणाऱ्या वेगवान, अभूतपूर्व व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विकासात्मक बदलामुळे रायगडच उद्याची महामुंबई होणार असल्याचा सूर अ‍ॅडव्हाण्टेज रायगड या संवादसत्रात सिडको, पनवेल महापालिका तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असला तरी वाढत्या शहराला अत्यंत महत्त्वाची मूलभूत गरज असते ती पाण्याची. नवी मुंबई महानगरपालिकेला व या शहराला जलसंपन्न शहर संबोधले जात असताना उद्याची महामुंबई हीसुद्धा जलसंपन्नच असल्याचा विश्वास राज्यकर्त्यांनी नव्हे प्रशासनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – उरण: मच्छिमारांच्या समस्या जाणून घेऊन नवीन धोरण बनविणार; केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचे प्रतिपादन

दरवर्षी एप्रिल मे महिना येताच वेध लागतात ते पाणी टंचाईचे. नव्या शहराच्या निर्मितीसाठी व महामुंबईसाठी सिडकोने नियोजन केल्याची माहिती दिली असून २०५० पर्यंत याच महामुंबईची लोकसंख्या ७० लाखापर्यंत पोहोचण्याचे चित्र असून त्यामुळे मानवाला आवश्यक असणाऱ्या अन्न, पाणी, निवारा या मूलभूत गरजांपैकी पाण्याची गरज भागवण्यासाठी सिडको व इतर शेजारील सर्व आस्थापना मिळून १२०० दशलक्षघनलीटर पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच महामुंबई शेजारी असणारी मोरबे, हेटवणे, बाळगंगा, कोंढाणे या धरणांच्या पाण्याचा वापर येथील वाढत्या लोकसंख्येच्या नियोजनासाठी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भिरा धरणावरून वाहून जाणारे ५०० एमएलडी पाणी नवी मुंबईला २५० एमएलडी व २५० एमएलडी पनवेल पालिकेला प्रत्येकी १२०० कोटी घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे महामुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या शहराची पाण्याची गरजही विचारात घेऊन आतापासूनच नियोजन करण्यात आले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. तर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ नियोजक पल्लवी परांजपे यांनीही नव्या शहराचे नियोजन करताना मूलभूत सुविधांचे प्रथम नियोजन करूनच वाढत्या शहरांच्या मुलभूत गरजांचा विचार नियोजनात केला असल्याचे सांगितले.

शहर उभे करताना त्याच्या मुलभूत गरजांचा विचार करूनच सिडकोने नवी मुंबई शहराची निर्मिती केली आहे. आगामी काळात या मुंबईत होणारा विकास, वाढते नागरिकीकरण यामुळे अत्यंत आवश्यक असलेल्या पाण्याची गरज ओळखूनच सिडकोने नियोजन केले आहे. त्यामुळे नवी मुंबईला जलसंपन्न शहर म्हटले जात असताना पाण्याबाबत महामुंबईही जलसंपन्न करण्याचे नियोजन निश्चितपणे सिडकोने केले आहे. विकास होताना तेथील नागरिकांची मूलभूत गरज ओळखूनच विकासाचे व नियोजनाचे मॉडेल सिडकोने आतापर्यंत साकारले आहे. त्यामुळे महामुंबई शहरालाही जलसंपन्न करण्याचे नियोजन तयार आहे. – कैलास शिंदे, सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको.

पनवेल महापालिकेला सद्यस्थितीला २६४ एमएलडी पाणी लागते. शहरात सरासरी २२० एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा होत आहे. पाण्याबाबत पालिकेने सुयोग्य नियोजन केल्यामुळे नवी मुंबई, पनवेल पालिकेप्रमाणेच महामुंबईसुद्धा जलसंपन्न करण्याच्यादृष्टीने शेजारील सरकारी सर्व आस्थापना प्रयत्नशील आहेत. – गणेश देशमुख आयुक्त ,नवी मुंबई महापालिका

शहरांच्या निर्मितीच्यादृष्टीने नियोजन करताना त्या ठिकाणच्या मुलभूत सोयीसुविधांमध्ये पाणी या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व असून त्याच दृष्टीने महामुंबईचा वाढता विस्तार पाहता प्राधिकरणाने नियोजन आराखडा निश्चित केला आहे. – पल्लवी, परांजपे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

हेही वाचा – नवी मुंबई : कामोठे येथे बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई; आरोपींमध्ये चार महिलांचाही समावेश

सूर विकासाचा ..जलसंपन्नेचा… पाणी तिथे वस्ती..पाणी तिथे विकास….

मानवनिर्मितीपासून पाणी तिथे विकास व विकास तिथे मानव आकर्षित झाल्याने मुलभूत आवश्यकता असलेल्या पाण्याच्या नियोजनातूनच शहरांची निर्मिती झाल्याचे अनेक ऐतिहासिक दाखले असल्याने शहरांच्या नियोजनात पाण्याला अनन्यसाधारण महत्तव दिले आहे.