लोकसत्ता, प्रतिनिधी

नवी मुंबई: नवी मुंबई मध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणांची कामे सुरु असणारी आहेत त्याचबरोबर, मलनिस्सारण वाहिन्या, महानगर गॅसची पाईप लाईन, पाण्याची पाईप लाईन, भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे अशी अनेक विकासकामे सुरु असल्यामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आल्यामुळे नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. रस्ते खोदून ठेवण्यात आल्यामुळे दुचाकी वाहनचालकांना व पादचाऱ्याना रस्त्याने चालणे जिकिरीचे झाले आहेत. खोदकाम करुन ठेवण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही चालायचे तरी कुठून असा सवाल नागरीक उपस्थित करत आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरु असताना काँक्रिटीकरणांचा रस्त्यांचा काम सुरु असलेला भाग हा पूर्णपणे बंद करण्यात येतो. परतु उरलेला अर्धा रस्ता हा वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला असताना, या ठिकाणी एकाबाजूने जाणाऱ्या वाहनांसाठी रस्ता खुला न ठेवता दोन्ही बाजूने जाणाऱ्या वाहनांसाठी रस्ता खुला ठेवण्यात येतो. त्यामुळे समोरासमोर दोन्ही वाहने आल्याने रस्त्यामध्ये वाहतुक कोंडी होत आहे. तसेच वाहनचालकांमध्ये शाब्दिक वादावादी देखील होत आहेत.

आणखी वाचा- एपीएमसी अग्नी अहवाल अडकला संचालक मंडळ मंजूरीच्या कात्रीत

वाशी येथील अग्निशामन केंद्राजवळ, कोपरखैरणे ब्लुय डायमंड चौक, महापे येथील भुयारी मार्ग, त्याचाप्रमाने मुळगावठाणा लगतचे रस्ते आदि ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहेत ती कामे संथ गतीने पार पडत असल्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना रोजच्या जाण्या-येण्याच्या मार्गात बदल करावा लागत आहे. तर ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्या ठिकाणी पुढे रस्ता बंद आहे. असा फलकही लावण्यात न आल्यामुळे वाहतुक कोंडीत भर पडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना च पादचाऱ्यांना पुढे जाऊन परत गेल्या पावालांनी परत यावे लागते. त्यामुळे वाहनचालक व पादचारी त्रस्त झाले आहेत. तसेच ज्या ठिकाणाची रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तरी देखील त्या रस्त्यंवरील वाळू, सिमेंट भुशाची कस तशीच पडून रहिल्यामुळे वाहने घसरून होऊन अपघात होण्याच्या घटना देखील घडत आहेत.

महानगरपालिका, महाविरण, महानगर गॅस, रिलायंस आदि कंपनीचे एकमेकाशी विचारविनिमय नसल्यामुळे रस्ते वारंवार खोदण्यात येतात. जर भूमिगत विद्युत वाहिन्या टाकलेल्या असताना एखाद्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाला तर ज्या ठिकाणी नादुरुस्त झाली आहे, ते शोधण्यासाठी रस्ता खोदण्यात येतो. तसेच रस्ते खोदल्यांनतर ते पूर्णपणे व्यवस्थित बुझवण्यात येत नसल्यामुळे रस्त्यांना खड्डे तसेच राहतात. रस्त्यांची कामे सुरु असताना फुटपाथ वर रस्त्यांतील डेब्रिज ठाकण्यात येते पंरतु रस्त्यांची कामे झाल्यांनतर मात्र रस्त्यांतील कच्चा माल हा तसाच फुटपाथवर राहतो. त्यामुळे पादचाऱ्यांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तरी रस्त्यांची असणारे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी व ज्या ठिकाणी रस्त्यांची काँक्रिकीटकरणाची कामे पूर्ण झाली आहेत त्या रस्त्यांवरील वाळू व रेतीचा थर हा साफ करण्यात यावा. अशी मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.

आणखी वाचा- शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयाविरोधात नवी मुंबईत निदर्शने

पावसाआधी अनेक कामे पूर्ण होणार….

मान्सून सुरु होण्याआधी रस्त्याच्या खोदकामाची परवानगी देणे बंद करण्यात आलेली आहे. तर जी कामे सुरु आहे ती मान्सून अगोदर बंद करण्यात येतील. जर मान्सूनमध्ये कोणी खोदकाम केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही नवीन कामांच्या खोदकामाला परवानगी देण्यात येणार नाही. -संजय देसाई, शहर अंभियता नमुंमपा

शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीची व काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना व विशेषतः पादचाऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. पालिकेने पावसाळ्याआधीही काम पूर्ण करावे अन्यथा पावसात नवी मुंबईकरांची मोठी अडचण निर्माण होईल. आत्ताच खोत कामामुळे आम्ही चालायचे कुठून असा प्रश्न निर्माण होतो. -दिनेश गोरे, नागरीक नेरूळ

Story img Loader