लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई : सीबीडी येथील पारसिक हिल डोंगरावरील हिरवाईत सिमेंटचे जंगल उभे राहत असताना आता डोंगर धोकादायक रित्या कापला जात असल्याचा दावा पर्यावरण वाद्यांनी केला आहे. याबाबत थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी तक्रार करण्यात आली आहे. या डोंगराच्या पायथ्याला एक शैक्षणिक संस्था उभी राहत आहे. शैक्षणिक संस्थेला आमचा कधीही विरोध नाही मात्र त्याचे काम धोकादायक होत असून भविष्यात भूस्खलन होण्याचा धोका वर्तवला जात आहे.

सिमेंटच्या जंगलात नवी मुंबईत गवळी देव डोंगर नंतर पारसिक हिल हे एकमेव असे ठिकाण होते. मात्र त्याही ठिकाणी सिमेंटचे जंगल झाले असून त्यात वाढच होत आहे. आता या डोंगराच्या पायथ्याला एका शैक्षणिक संस्थेला ४ हजार १३९ चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. शैक्षणिक संस्थेची इमारत उभी करण्यासाठी डोंगराचा काही भाग कापला जात आहे. असा दावा नॅक संस्थेचे अध्यक्ष बी एन कुमार यांनी केला आहे. या ठिकाणी डोंगर पायथ्याला सुरू असलेले काम धोकादायक असून भूस्खलन होण्याचा धोका आहे, असे ते म्हणाले.

आणखी वाचा-‘अटलसेतू’तील खारफुटींचे संरक्षण करा’

यापूर्वी सुशोभीकरणाच्या नावाखाली मधूनच टेकडी कापण्याचा प्रकार झाला होता. त्यावर पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला होता. तसेच याची दखल राज्य मानवाधिकार आयोगाने स्वत:हून घेतली आणि सिडकोला संबंधित विकासक कारवाई करावी लागली, अशी माहिती बी एन कुमार यांनी दिली. अशी कारवाई होऊनही आता पुन्हा त्याच पद्धतीचे काम सुरू आहे. हीच बाब पारसिक हिलवरील रहिवाशांनीही अधोरेखित केली. यासंबंधी सिडको जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता संबंधित विभागाकडून माहिती घेऊन देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र माहिती मिळू शकली नाही.

गवळी देव डोंगर पारसिक डोंगर हे शहराला प्राणवायू देणारी स्थळे आहेत. मात्र भूखंड देणारी सिडको असो वा बांधकाम परवानगी देणारी मनपा असो दोन्ही आस्थापना अधिकाऱ्यांना याची जाणीव नाही. वसुंधरा पुरस्कार मिळवणारी मनपा अशा पद्धतीने निसर्ग ऱ्हास करण्यात हातभार लावत असल्याने धक्का बसतो. -सुधीर दाणी, अध्यक्ष, अलर्ट इंडिया सामाजिक संस्था

शैक्षणिक संस्थेला आमचा विरोध नाही मात्र बांधकाम करताना निसर्गाचा ऱ्हास किती करणार? भविष्यात भूस्खलन सारखे धोके दिसत आहेत. २०२२ मध्येच्या पावसाळ्यात टेकडीवर दरड कोसळून पाणीपुरवठा देखरेख केंद्राचे नुकसान झाल्याची घटनेपासून काही शिकणार की नाही ? -बी एन कुमार, अध्यक्ष, नॅक