उरण येथील महाजनको च्या वायू विद्युत केंद्रात दुपारी १२ साडेबारा वाजताच्या दरम्यान वेस्ट हिट रिकव्हरी या विभागात स्फोट झाला. या स्फोटात विष्णू पाटील, कुंदन पाटील व अभियंता विवेक धुमाळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नवी मुंबईतील बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान अभियंता विवेक धुमाळचा मृत्यू झाला.

हेही वाचा- नवी मुंबई : बांधकाम बेकायदा..पण घरांच्या किंमती ३ ते ६.६० करोड ?

घटनेची माहिती मिळताच द्रोणागिरी मधील अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना शोधून त्यांना उपचारासाठी रवाना केले आहे.
प्रत्यक्षदर्शीच्या मते यातील एक जण ९० टक्के भाजला आहे. स्फोट झाल्यानंतर येथील वायू विद्युत केंद्रा शेजारी असलेल्या बोकडविरा गाव व वायू विद्युत केंद्राच्या कामगार वसाहतीतील घरांना हादरे बसले असल्याची माहिती येथील नागरीकांनी दिली. प्रकल्पात अशाच प्रकारच्या स्फोटाच्या घटना यापूर्वी ही घडल्या आहेत. त्यामध्ये कामगारांचा मृत्यू झाले आहेत.

हेही वाचा- उरणच्या २२०० हेक्टर खारफुटींचे होणार संरक्षण

वेस्ट हिट रिकव्हरी प्रकल्पात स्फोट

वायू विद्युत केंद्राच्या वायू पासून वीज निर्मिती झल्यानंतर वायूच्या वाफेवर प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जात होती. या दरम्यान वाफेच्या पाईपचा स्फोट होऊन बाहेर पडलेल्या वाफेमुळे दोन कामगार आणि एक अभियंत्याच्या भाजल्याची घटना घडली आहे.

Story img Loader