नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मान्सून पूर्व कामांतर्गत वृक्षांचे सर्वेक्षण करून छाटणी केली जाते. खासगी सोसायटीच्या आवारात वृक्ष छाटणी करताना महापालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी आवश्यक असते. मात्र यामध्ये नियमातून अतिरिक्त क्षमतेपेक्षा जास्त वृक्ष छाटणी करण्यास मनाई आहे. तरीदेखील अशाप्रकारे अतिरिक्त वृक्ष छाटणी होत असून याकडे महापालिकेचे सपेशल दुर्लक्ष होत आहे. वाशी सेक्टर ९ मध्येही गृहसंकुलाकडून अतिरिक्त वृक्ष छाटणी करण्यात आली आहे.
पावसाळ्यात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी धोकादायक वृक्ष सर्वेक्षण आणि छाटणी केली जाते. खासगी सोसायटीच्या अंतर्गत महापालिकेची परवानगी घेऊन केली वृक्ष छाटणी केली जाते. परंतु काही ठिकाणी छाटणीबाबत असलेल्या सूचनांचे पालन न करता परवानगीचा गैरफायदा घेतला जात आहे. पावसाळ्यात झाडांची छाटणी करताना लोंबकळणाऱ्या फांद्या तोडणे अपेक्षित असते, जेणेकरून झाडांवरील भार कमी होऊन वादळात अथवा जोरदार पावसाळ्यात झाडे कोसळणार नाही. तसेच झाडांचे शेंडे किंवा बुंध्यापासून तोडणे हे एक प्रकारे झाड तोडण्यासारखेच आहे. ही वृक्ष छाटणी उद्यान सहाय्यक यांच्या निगराणीखाली करावी लागते. पंरतु तसे न होता उद्यान सहायकांच्या उपोरोक्ष केली जात असून झाडे शेंडे आणि बुंध्यापासून तोडली जात असून, अतिरिक्त छाटणी केल्याचे निदर्शनास येत आहे.
हेही वाचा – स्वराज कंपनीशी दगडखाण करार स्वखुशीने, पत्रकार परिषदेत खाण मालक संघटनेचा खुलासा
वाशी सेक्टर ९ मध्ये असाच प्रकार घडला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त वृक्ष छाटणी करण्यात आली आहे. झाडाची अतिरिक्त छाटणी केल्याने झाड सुकून मरण्याची शक्यता आहे. मागील वर्षी सेक्टर २ मधील एका खासगी सोसायटीत अशाच प्रकारे अतिरिक्त वृक्ष छाटणी केली होती. त्यातील ३० ते ३५ टक्के वृक्ष सद्यास्थिस्तीत सुकून मरण पावले आहे. त्यामुळे अशा प्रकारची वृक्ष छाटणी झाडांच्या मुळावर उठत आहे. याकडे महापालिका उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत असून, पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.