नवी मुंबई – आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे.मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यावरून दरवर्षी वादंग निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते परंतु यावर्षी निवडणूक आयोगातर्फे मतदान कक्षाबाहेरच मतदारांना आपले मोबाईल ठेवण्यासाठी मोबाईल लॉकरची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे या सुविधेबाबत मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

नागरिकांच्या जीवनामध्ये मोबाईल ही आज प्रत्येकाची गरज बनली आहे .परंतु मतदान करण्यासाठी जाताना नेहमी पोलीस व मतदारांमध्ये तसेच मतदार कर्मचाऱ्यांमध्ये वादांगाचे प्रसंग होत असल्याचे पाहायला मिळत होते. परंतु यंदा निवडणूक आयोगामार्फतच प्रत्येक मतदान कक्षाबाहेर मतदान लॉकरची सुविधा केल्यामुळे मतदानासाठी जाणाऱ्या नागरिकांना आपला मोबाईल मोबाईल लॉकरमध्ये सुरक्षित ठेवता येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मोबाईल लॉकरमध्ये जवळजवळ सहा मोबाईल ठेवण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. आपला मोबाईल निवडणूक आयोगामार्फत निर्माण करण्यात आलेल्या मोबाईल लॉकरमध्ये ठेवल्यानंतर त्याला लॉक करून मतदारांना मतदान कक्षामध्ये जाता येत आहे. तसेच मतदान करून मतदान कक्षाबाहेर आल्यानंतर आपल्या लॉकर मधून मोबाईल घेऊन मतदान कक्षाबाहेर पडता येत आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या बाहेर मोबाईल ठेवावा लागत होता. त्यामुळे मतदारांमध्ये तसेच पोलीस व मतदान कर्मचाऱ्यांमध्ये वादंगाचे प्रसंग निर्माण होत होते. परंतु यावेळी  निवडणूक आयोगामार्फतच मतदान कक्षाबाहेर मोबाईल लॉकरची सुविधा केल्यामुळे मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?

हेही वाचा >>>बेलापुरात बंडखोरांना साथ देणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी, मंदा म्हात्रे यांनाच विजयी करण्याचे आवाहन

दरवर्षी मतदानाला जाताना मोबाईल घेऊन जायचं की नाही तसेच मोबाईल घेऊन गेल्यावर तिथे मोबाईल कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे मतदान  कर्मचारी  यांच्यामध्ये नेहमी वादाचे प्रसंग निर्माण होत होते. कारण घरापासून मतदान केंद्र लांब असल्यामुळे मतदारांना पुन्हा मोबाईल ठेवण्यासाठी घरी जावे लागत होते. त्याच्यातून आता मुक्तता झाली आहे. निवडणूक आयोगाने केलेले या सुविधेबद्दल आम्ही समाधानी आहोत.- दिनेश खोत,मतदार

Story img Loader