नवी मुंबई : नवी मुंबईत उत्तम दर्जाच्या आरोग्यव्यवस्था सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. महानगरपालिका स्वत:चे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४ जागांची  प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक तसेच वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी यांची प्रक्रिया राबविणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी २२ व २३ सप्टेंबरला नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत आवश्यक व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आहे. याबाबतची जाहीरात नुकतीच प्रसिध्द करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर

हेही वाचा : फी अभावी १८ विद्यार्थी वर्गाबाहेर; विद्यार्थ्यांच्या आईवर मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ

पदव्युत्तर संस्थेसाठी  महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती वेगवान कार्यवाही करण्यात येत आहे. त्याच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी  केंद्राच्या  आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने  ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले असून ५ शाखांचे पदव्युत्तर वैद्यकिय महाविद्यालय आगामी शैक्षणिक वर्षात सुरु होणार आहे. त्यासाठी केंद्राचे पाहणीपथकही नवी मुंबईत पदव्युत्तर  वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पाहणी करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. एकीकडे पदव्युत्तर संस्थेसाठी प्राध्यापक ,सहयोगी प्रध्यापक यांच्यासह एकूण ४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामध्ये औषध, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र,अस्थिव्यंग,बालरोग,जनरल सर्जरी अशा विभागांमध्ये मिळून एकूण ४४ जागांची भरती करण्यात येणार आहे.याबाबतची सविस्तर माहिती www.nmmc.gov.in या पालिकेच्या संकेतस्थळावरही याबाबतची माहिती उपल्बध होणार आहे. पालिकेच्या पहिल्या वर्षात ५ विभागाच्या १७ युनिट असणार आहेत.त्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नवी मुंबई महापालिकेचे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार असून त्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

प्रमोद पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी ,नवी मुंबई महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Faculty recruitment post graduate medical college navi mumbai municipal corporation ysh