मागील वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या युक्रेन-रशिया संघर्षामुळे तेलाची आयात घटली होती. त्यामुळे तेलाचे दर कडाडले होते. १५ लिटर तेलाच्या दराने ३ हजार रुपयांचा टप्पा पार केला होत तर प्रति लिटर २००रुपयांवर गेले होते. मार्चपासून उत्पादन वाढल्याने तेलाच्या दरात आणखीन घरसण झाली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत मार्च मध्ये २% ते ३% दर कमी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नवी मुंबई : पनवेल परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी; आरोपीस अटक

भारताला वर्षाकाठी १ करोड टन खाद्य तेलाचा पुरवठा होतो. त्यापैकी २५ लाख टन सूर्यफूल तेल तर ६०-७०लाख टन पाम तेल आयात होते. यापैकी ७५% सुर्यफुल तेल हे युक्रेन तर २०% रशिया आणि ५% अर्जेंटिना येथून आयात होते . पामतेल हे मलेशिया आणि इंडोनेशिया येथून आयात होते. देशाला लागणारे सूर्यफूल तेल हे युक्रेन आणि रशिया मधून मोठ्या प्रमाणात आयात होत असते,मात्र मागील वर्षीच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दिवाळीपर्यंत तेलाचे दर चढेच होते. गेल्या दोन तीन महिन्यांपासून तेलाच्या दरात घसरण होत असून मार्चमध्ये उत्पादन वाढल्याने दर आणखीन उतरले आहेत. सूर्यफूल तेलाच्या १५ लिटरला मागील महिन्यात २हजार २००रुपये मोजावे लागत होते तेच दर आता १ हजार ९०० ते २ हजार रुपयांवर आले आहेत. खाद्य तेलाचे दर कमी होत असल्याने गृहिणींना दिलासा मिळत आहे.

हेही वाचा- उरण ते खारकोपर रेल्वे मार्गाची प्रतिक्षा संपणार? शनिवारी सुरक्षा तपासणी होणार

शेंगदाणे तेलाचे दर मात्र चढेच

महाराष्ट्र, गुजरात सह देशातील १८ राज्यातून शेंगदाणा तेलाची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. विशेषतः गुजरात मधून ही निर्यात अधिक होती असून चीनला केली जाते. सध्या बाजारात तेलाचे उत्पादन वाढल्याने इतर तेलांच्या दरात २ ते ३ टक्क्यांनी घसरण झालेली आहे. परंतु शेंगदाणे तेलाचे दर मात्र वाढले आहेत. मागील महिन्यात प्रतिलिटर १६० ते १६५ रुपयांवर उपलब्ध असलेले शेंगदाणे तेल आता १७० ते १७५ रुपयांवर उपलब्ध आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसीत हापुस निर्यातीला सुरुवात

गेल्या वर्षी युक्रेन रशिया युद्धामुळे तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. परंतु गेल्या दोन-तीन महिन्यांपासून खाद्यतेलांचे दर उतरण्यास सुरुवात झाली आहे. मार्चमध्ये तेलाचे उत्पादन वाढल्याने दर दोन ते तीन टक्क्यांनी कमी झाले आहेत. सरकारने १५% इम्पोर्ट ड्युटी रद्द केल्याने दरात पुन्हा दोन ते चार रुपयांची दरवाढ झाली आहे, अशी माहिती एपीएमसीतील घाऊक व्यापारी तरुण जैन यांनी दिली.

हेही वाचा- नवी मुंबई महापालिकेचे कचरा वाहतूक व संकलनासाठी वारंवार ठेकेदाराला मुदतवाढीची घंटा…..

खाद्य तले प्रकार दर (१लिटर)

आधी आता

सूर्यफूल १२५-१३५ १२०
सोयाबीन १२०-१२५ ११५-११६
पाम १०५-२०८ १०२-१०५
शेंगदाणे १६०-१६५ १७०-१७५

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fall in edible oil prices in apmc market navi mumbai dpj