उरण : सेंद्रिय खत आणि नैसर्गिक पद्धतीने पिकणाऱ्या चविष्ट आणि गोड वालांना भौगोलिक मानांकन मिळावे अशी मागणी चिरनेरच्या शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी चार वर्षांपूर्वी कृषी विभागाकडून हा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र त्याची दखल घेण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

चिरनेरचे शेतकरी अतिशय कष्टाने आणि नेटाने सेंद्रिय खतांचा आणि नैर्गिक पद्धतीचा वापर अनेक वर्षे उत्तम प्रतीच्या वालाचे पीक घेत आहेत. भात शेतीनंतर हे पीक घेतले जाते. थंडीच्या दिवसांत पडणाऱ्या दवावर या वालाचे पीक घेतले जाते. शेणखत आणि शेतातील पालापाचोळा यांचा वापर करून हे पीक घेतले जाते. या पिकांचे जंगलातील प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जागवाव्या लागतात.

Mumbai , Green area, sea coast , greenery,
सागरी किनारा मार्गालगत तयार करणार हरित क्षेत्र, पालिकेचा पैसा खर्च न करता हिरवळ तयार करण्यासाठी कंपन्यांकडून अर्ज
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Mission Bhagirath Prayas
नाशिक : मिशन भगीरथ प्रयासमुळे भूजल पातळीत वाढ, काठीपाडा परिसरास लाभ
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
Kalyan-Dombivli water, amrit water channel,
कल्याण-डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट, अमृत जलवाहिनीचे काम सुरू असताना विद्युत वाहिका तुटली
agricultural and livestock exhibition inaugurated by sharad pawar
कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्यांना कृषी विद्यापीठाने साथ द्यावी ; शरद पवार यांची अपेक्षा
Drought of Funds , Micro Irrigation Scheme,
सूक्ष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ, राज्यातील पावणेदोन लाखहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित

हेही वाचा >>>नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव; वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

चिरनेर मधील वालाचे वाण हे पारंपरिक आहे. त्याचे जतन करण्याचे काम येथील सेंद्रिय शेती गटाने केले आहे. त्यांच्या माध्यमातून वालांना भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चार वर्षांपूर्वी दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडे या संबंधीचा प्रस्ताव उरणच्या कृषी विभागाकडून पाठविण्यात आला आहे. त्यानंतर याचा पाठपुरावा ही करण्यात आला आहे.मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती चिरनेर येथील प्रयोगशील शेतकरी प्रफुल्ल खारपाटील यांनी दिली आहे.

भौगोलिक मानांकनासाठी कृषी विद्यापीठाकडून पिकाची तपासणी करून संशोधना अंती त्याचा अहवाल तयार केला जातो त्यानंतर भौगोलिक मानांकनाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र अर्ज करून ही कृषी विद्यापीठा कडून दखल घेतलेली नाही. चिरनेरच्या वालाला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र त्याबद्दलची माहिती घेऊन सांगतो असे मत उरणच्या तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी दिली आहे.

हेही वाचा >>>देशाच्या केंद्रस्थानी अध्यात्म!‘इस्कॉन’ मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

अडीचशे रुपये किलोचा दर

चिरनेरच्या सेंद्रीय वालाला बाजारात इतर वालांच्या तुलनेत अधिकचा दर मिळत आहे. इतर वालाना १०० ते १२५ दर मिळत असताना चिरनेरच्या वालांना मात्र किलोला २५० रुपयांचा दर मिळत आहे.

चिरनेरचा वाल हा चविष्ट असल्याने वालाच्या शेंगाची पोपटी प्रसिद्ध आहे. त्यामुळे चिरनेर परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढून दरही वाढेल.

Story img Loader