सिडकोने उरण मधील उर्वरित शेतकऱ्याच्या जमिनी संपादीत करण्याची जाहीर सूचना प्रसिद्ध केली असून या भूसंपादनाला विरोध दर्शविण्यासाठी शुक्रवारी तेलीपाडा येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी या सभेत सिडकोने भूसंपदानाच्या १२ ऑक्टोबरची अधिसूचना रद्द करा तसेच शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनी संपादीत न करता २००५ मध्ये नवी मुंबई सेझला विकासासाठी जमिनी दिल्या आहेत. त्याचा वापर न झाल्याने त्या परत घेऊन काय तो सिडकोने विकास करावा ही मागणी या जाहीर सभेत केली आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई : खासगी बसमध्ये अग्निशमन यंत्रणेचे तीनतेरा

१२ ऑक्टोबर २०२२ ला सिडकोने उरण तालुक्यातील चाणजे,नागाव,रानवड,बोकडविरा,फुंडे,नवघर,पागोटे या गावातील जमिनी संपादीत करण्यासाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. ही अधिसूचना म्हणजे सिडको शहराची निर्माती नाही तर स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांची राहती घरे उध्वस्त करणारी असल्याने तसेच सिडकोच्या आर.पी. झेड. रिजनल पार्क झोन या बड्या श्रीमंतासाठी उभारण्यात येणाऱ्या पार्क विरोधात उरण मधील शेतकरी एकवटला आहे. या विरोधात उरण मध्ये सभा घेण्यात येत आहेत. यामध्ये बुधवारी नागाव मध्ये शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेत आपल्या पूर्वजानी राखलेल्या सांभाळल्या त्या जमिनी शेतकरी आणि त्यांच्या वारसांनी जपल्या पाहिजेत असेही आवाहन केले. त्यानंतर चाणजे शेतकरी कृती समितीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी सिडकोच्या भूसंपदानाला हरकती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी समितीच्या वतीने हरकतीचे अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. या नोटीस ला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकरी रस्त्यावरील लढाई ही लढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. हा विरोध हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा लढा आहे. त्यामुळे तो प्राणपणाने लढणार असा निर्धार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या संपादनात समाविष्ट करण्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. आशा जमिनीवर बांधण्यात आलेली हजारो घरे शेतकरी व त्यांचे वारस आणि इतरांनी या जमिनी विकत घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनीवर घरे आहेत. या हजारो घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी ही प्रकल्पग्रस्त व शेतकरी एकवटला आहे.

हेही वाचा >>>रस्त्यावर वाहन उभे करतायं… सावधान! डिझेल चोरांचा पनवेलमध्ये धुमाकूळ

या जाहीर सभेत सिडको ही देशातील सर्वात मोठी इस्टेट एजंट आहे. सिडकोचे नवी मुंबई वसविण्याचे काम संपले आहे त्यामुळे सिडको बरखास्त करा ही मागणी त्यांनी करुन शेतकऱ्याच्या जमिनी काही शे रुपयात घेऊन कोट्यवधी चौरस मीटर दराने विकल्या असल्याचे मत ९५ गाव प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष अड. सुरेश ठाकूर यांनी व्यक्त केले. यावेळी समितीचे सचिव सुधाकर पाटील, कामगार नेते कॉ.भूषण पाटील, किसान सभेचे रामचंद्र म्हात्रे,संजय ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार,विजय पाटील,सुरेश पवार यांनी आपले विचार मांडले. तर अरविंद घरत व अनंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या सभेला प्रकल्पग्रस्त गावातील शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.