पनवेल: नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्रातील (नैना) शेतकऱ्यांचा शासनाने सिडकोच्या अभिप्रायानंतर १५ मार्च रोजी जाहीर केलेल्या सूधारीत एकत्रितकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीला (युडीसीपीआर) विरोध केला आहे. हा विरोध नैना क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविला पाहीजे यासाठी मंगळवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पनवेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत १५ एप्रिलपर्यंत नैनाबाधित ९५ गावांतील शेतजमिनी मालकांनी सूधारीत युडीसीपीआर विरोधात हरकती नोंदविण्यासाठी नैना उत्कर्ष समिती गावागावात जाऊन जनजागृती करणार असल्याचे ठरले. सूधारित युडीसीपीआर कायद्याकडे नैनातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र सूधारीत युडीसीपीआरमध्ये शेतकऱ्यांच्या हिताची बाब नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा संघर्षाची भूमिका घेतली. शेतकरी आक्रमक झाल्याने नैना क्षेत्रातील विकास खुंटण्याची चिन्हे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा