उरण : प्रस्तावित विरार अलिबाग बुद्देशीय महामार्गामुळे बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करतांना विश्वासात न घेताच सरकार एकतर्फी निर्णय घेत आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला व पुनर्वसनाच्या हक्का पासून वंचित राहावे लागणार असल्याने या संपादन प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध असून संपादनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय विरार अलिबाग विरोधी संघटनेच्या उरण मधील शेतकर्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.जर शेतकर्यांच हित साधणारा नसेल तर या प्रकल्पाला कायदेशीर विरोध करण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला.प्रस्तावित बहुउद्देशिय विरार अलिबाग मार्गाला अलिबाग पासून ते विरार पर्यंतचे शेतकरी विविध मार्गाने विरोध करत आहेत शेतकर्यांना दिल्या जाणाऱ्या अल्प मोबदल्यामूळे त्याचप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांकडूनही शेतकर्यांची दिशाभूल केली जात आहे त्यामूळे. उरण मधील शेतकऱ्यांचा देखील या मार्गाला विरोधात असून चिरनेर मध्ये शासनाच्या मोजणीला विरोध करून ती रद्द करायला लावली होती.
विरार अलिबाग महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकरी न्यायालयात आव्हान देणार ; शेतकर्यांना देशोधडीला लावणारा महामार्ग नको , शेतकऱ्यांचा विरोध
प्रस्तावित विरार अलिबाग बुद्देशीय महामार्गामुळे बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करतांना विश्वासात न घेताच सरकार एकतर्फी निर्णय घेत आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-09-2022 at 18:38 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers will challenge the land acquisition of virar alibag highway in courtm amy