नवी मुंबई: भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रकार माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत. असा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नवी मुंबई भाजप महिला मोर्चाने केली आहे. या बाबत आज एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी निवेदन दिले आहे. आव्हाड यांनी ९ जुन रोजी रात्री १२ वाजून ५३ मिनिटांची चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामकारक मजकूर ट्विटवर अपलोड केला आहे.

चित्रा वाघ यांची मानहानी करण्याचा. त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठविण्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.असा दावाही यावेळी केला गेला.   जिजाऊ, सावित्री बाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत, हे सहन केले जाणार नाही म्हणून महिला नेत्या चित्रा वाघ यांची ट्विटरवरून बदनामी, मानहानी केल्याप्रकरणी आणि बदनामकारक मजकूर ट्विटरवर टाकल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी विनंती करीत एपीएमसी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. 

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
Female officer of provident fund office assaulted Shivajinagar police files case against businessman
भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
priti karmarkar
स्त्रीप्रश्नांविषयी आग्रही आणि संवेदनशीलही!
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!
Woman police officer assaulted by woman on bike
दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की; वारजे भागातील घटना
Story img Loader