उरण : सध्या अनेक ठिकाणी माती, कचरा आणि राडारोडा टाकून खारफुटी (कांदळवन) मारली जात आहे. याकडे सिडको आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणवाद्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विकासकांच्या फायद्यासाठी अनेक ठिकाणच्या खारफुटीवर मातीचा, कचऱ्याचा भराव टाकून ती मारली किंवा नष्ट केली जात आहे.
खारफुटीवर ही संरक्षित आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी अतिशय महत्वाची आहे. या खारफुटीच्या संवर्धनासाठी अनेक उपाययोजना केंद्र आणि राज्य सरकारने आखल्या आहेत. याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासन, वन विभाग यांची आहे. तर दुसरीकडे राडारोडा आणि कचऱ्याच्या भरावामुळे प्रदूषण निर्माण होत आहे. याकडेही या विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचे ‘धनुष्य’ गणेश नाईकांच्या खांद्यावर? ठाण्याच्या जागेसाठी मनोमिलन?
नवी मुंबईसाठी उरण पनवेल आणि नवी मुंबईतील ज्या बेलापूर पट्टीतील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या आहेत त्यासर्व जमिनी या समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील आहेत. येथील जैवविविधता आणि समुद्राच्या नैसर्गिक पाणी निचऱ्याची व्यवस्था ही खारफुटीच्या सहजीवनाची आहे. मात्र विकासाच्या नावाखाली येथील नैसर्गिक प्रवाह बंद किंवा बुजवून त्याठिकाणी मातीचा भराव करण्यात आला आहे. परिणामी अनेक ठिकाणी खारफुटीत वाढ झाली आहे. मात्र खारफुटी ही समुद्राच्या लाटा आणि त्सुनामीसारख्या प्रकोपाच्या वेळी होणारी किनाऱ्याची धूप थांबवून किनारपट्टीवर जीव, जंतू प्राणी यांच्या सुरक्षेची महत्वाची भिंत आहे. त्याचे संवर्धन आणि संरक्षण ही मूळ कामगिरी खारफुटी करीत आहे. मात्र हीच नष्ट केली जात आहे. त्यामुळे खारफुटीचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा – जरांगे यांच्या रविवारी होणाऱ्या बैठकीबाबत उत्सुकता, ‘मराठा मतपेढी’ दिशा देणार
हेही वाचा – मिरजेतील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार
यासाठी पर्यावरणवाद्यांनी सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. तसेच आंदोलनेही केली आहेत. त्यासाठी न्यायालयातही भूमिका मांडली आहे. नवी मुंबई नंतर झपाट्याने विकसित होत असलेल्या उलवे नोडमधील सेक्टर २ मधील काही ठिकाणी अशा प्रकारचा मातीचा भराव येथील खारफुटीवर टाकण्यात येत आहे. या संदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद नाही.