Irshalwadi Landslide Survivors : पनवेल : मागील वर्षी १९ जुलैच्या अतिवृष्टीत खालापूर येथील डोंगरावरील इरशाळवाडी दरडीखाली गाडली गेली. यामध्ये ८४ जणांनी त्यांचे प्राण गमावले. या वाडीतील बचावलेल्या १४४ आदिवासींचे पुनर्वसन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. राज्य रस्ते विकास महामंडळाने या पुनर्वसित वाडीचा आराखडा बनविल्यानंतर सिडको महामंडळाने नवीन आदिवासीवाडी बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले.

आदिवासी बांधवांसाठी ४४ पक्की घरे बांधण्याचे काम नानिवली गावात अंतिम टप्यात सूरु आहे. अजून महिनाभरात या घरांचे बांधकाम व इतर पायाभूत सुविधांचे काम पुर्ण होईल, असा विश्वास सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी लोकसत्तासोबत बोलताना व्यक्त केला. 

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
home voting in nala sopara
वसई: नालासोपाऱ्यात १२१ नागरिकांचे गृहमतदान
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल

हेही वाचा…Yashashree Shinde Murder Case : दाऊद शेखला अटक झाल्यानंतर यशश्रीच्या आईची थेट मागणी; म्हणाली, “टॉर्चर करून त्याला…”

इरशाळवाडीवर कोसळलेल्या दरडीच्या घटनेला नुकतेच वर्ष उलटले. या घटनेमध्ये २७ जणांचे मृतदेह दरडीखालून काढले तर बचावकार्यानंतरही ५७ जणांचे मृतदेह न सापडल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आल्याने मृतांची संख्या ८४ वर पोहचली. याच वाडीतील ३१ विद्यार्थी विविध आश्रमशाळेत त्यावेळेस शिक्षण घेत असल्याने ते बचावले. सरकारने १४४ आदिवासी बांधव व त्यांच्या कुटूंबियांचे या घटनेनंतर जुन्या मुंबई पूणे महामार्गालगत चौक येथे कंटेनरमध्ये तात्पुरती घरे तयार करुन आदिवासी बांधवांचे पुनर्वसन केले. मागील वर्षभरापासून हे आदिवासी बांधव येथेच राहतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी बांधवांच्या पुनर्वसनात कोणतीही कमी पडू नये म्हणून वारंवार सरकारी यंत्रणेकडे आढावा घेतला आहे. सिडको मंडळाने तब्बल ३० कोटी रुपये खर्च करुन या आदिवासी बांधवांचे पुनर्वसनासाठी नवीन इरशाळवाडी उभारण्याचे काम झपाट्याने हाती घेतल्याने हे काम पुर्णत्वाकडे आले आहे. नानिवली गावातील २.६ हेक्टर जमीनीवर या नवीन इरशाळवाडीत आदिवासी बांधवांना त्यांच्या जुन्या वाडीप्रमाणे प्रशस्त घराची रचना आराखड्यात करण्यात आली आहे. नवीन प्रत्येक घराचे क्षेत्रफळ ३०० चौरस फूट असणार आहे.

हेही वाचा…Yashashree Shinde Murder Case: “पुरुषाला धर्म नसतो…”, शर्मिला ठाकरेंचा संताप; दाऊद शेख आणि मंदिराचे पुजारी यांना शिक्षा देण्याची मागणी

आदिवासी बांधवांना त्यांच्या नवीन घराच्या शेजारी मोकळी जागा आणि सर्व सोयीसुविधा कशा मिळू शकतील, या पद्धतीने सिडको मंडळाने या घरांची व घरा सभोवतालच्या परिसराचा विकास केला आहे. यामध्ये घरांसोबत रस्ते व पिण्याच्या पाण्यासोबत, प्राथमिक शाळा आणि आंगणवाडीसाठी १ हजार चौरस मीटर क्षेत्रावर काम सूरु आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तीनशे चौरस मीटर जागा आणि समाजमंदीरासाठी ३०५ चौरस मीटर जागेवर काम सुरू आहे. तसेच २ हजार ७२० चौरस मीटर जागेवर खेळण्यासाठी मोकळे मैदान विकसित केले जात आहे. ५०० चौरस मीटर जागेवर आदिवासी बांधवांसाठी बगीचा असणार आहे. हे सर्व बांधकाम अंतिम टप्यात असून संबंधित वाडी ही समुद्रसपाटीपासून उंच असल्याने भविष्यातील या वाडीला धोका उद्भवू नये म्हणून संपूर्ण वाडीला संरक्षण भिंत बांधण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. उन्हाळ्यात या वाडीचे काम झपाट्याने सुरू होते. एक वर्ष पूर्ण होण्याअगोदर आदिवासी बांधवांना त्यांच्या घरांचा ताबा देण्याचे नियोजित होते. परंतू रायगड जिल्ह्यात पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे अजून एक महिना अंतिम टप्यातील काम पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. 

हेही वाचा…Yashshree Shinde Murder : यशश्री शिंदेची हत्या दाऊद शेखने कशी केली? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

मा. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनूसार इरशाळवाडीमधील आदिवासी बांधवांचे पुनर्वसन सिडको महामंडळ करत असताना आदिवासी बांधवांच्या नवीन घरांच्या प्रकल्पामध्ये आदिवासी बांधवांना पायाभूत सोयीसुविधा महामंडळाकडून उभारल्या जात आहेत. सध्या येथील बांधकाम अंतिम टप्यात असून संबंधित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासोबत आदिवासी बांधवांना भविष्यात पायाभूत अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून घरांचे काम दर्जेदार असण्यासोबत ते सुरक्षित असण्यासाठी मंडळाचे अभियंता विभाग काम करीत आहे. पुढील महिनाभरात हे काम पुर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. – विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको महामंडळ