आर्थिक दुर्बल घटकांना नवी मुंबई मनपाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती फार्म भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात त्यातील काही कागदपत्रे मिळवण्यात विलंब होत असल्याने मुदत वाढीची मागणीही समोर येत आहे. फार्म भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी बाबत प्रकल्पग्रस्त पुनर्वसन संस्था समोर आली असून अशा घटकांना फार्म भरण्यासाठी तीन केंद्रही स्थापन केलेली आहे तसेच प्रत्येक प्रभागात एक स्वयंसेवक उपलब्ध करण्यात आला आहे.
हेही वाचा- रायगड जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन
पैशा अभावी अनेक हुशाल विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणून शासनाने शिष्यवृत्ती सुरू केली. नवी मुंबई मनपा द्वाराही शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र त्यासाठी सध्या ऑनलाईन फार्म भरून द्यावा लागतो. मात्र आजही अनेकांना ऑनलाईन फार्म भरता येत नाही. त्यात अनेक किचकट मुद्दे, सर्वर डाऊन असणे, अशा अनेक अडचणी येत आहेत. यासाठी नवी मुंबई प्रकल्पग्रस्त पुनर्वसन सामाजिक संस्था सरसावली आहे. या साठी शहरातील १११ प्रभागासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. तर सानपाडा सोनखर येथे तीन कार्यालयात थेट सुविधा करून देण्यात आली आहे. यासाठी कुठलेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना फार्म भरून देण्यात येणार आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा- नवी मुंबई : ‘त्या’ मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही, अकस्मात मृत्यू म्हणून नोंद
याशिवाय संस्थेने मनपा कडे काही मागण्याही केल्या आहेत. त्यात शिष्यवृत्ती फार्म मध्ये उत्पन्न दाखल मागितला जातो मात्र हा दाखल मिळवण्यास किमान ७/८ दिवस लागतात त्यामुळे फार्म भरण्याची मुदत १५ दिवसांनी वाढवून द्यावी, मनपा शिक्षण विभागाने या बाबत शाळेत ही सुविधा निर्माण करून द्यावी, या शिवाय शिष्यवृत्ती साठी जास्तीत जास्त जनजागृती करावी. १११ प्रभागात कार्यालय उघडावीत तेथे फार्म भरून देण्यास मदत करावी.
आर्थिल दुर्बल घटक असल्यानेच शिष्यवृत्ती फार्म भरत आहेत.त्यांच्या कडे संगणक साधन नसते मोबाईल असला तरी फार्म भरताना एक जरी चूक झाली अडचण आली तर पूर्ण प्रक्रिया सुरवातीपासून करावी लागत आहे. मनपा शिक्षण विभागातील लोकांनाही फार्म भरताना अडचणी आल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आम्ही पुढाकार घेतला आहे. अशी माहिती संस्था अध्यक्ष दशरथ भगत यांनी दिली.